Home यवतमाळ चिखलवर्धा येथे ईद मिलन व मस्जिद परिचय कार्यक्रम संपन्न..!

चिखलवर्धा येथे ईद मिलन व मस्जिद परिचय कार्यक्रम संपन्न..!

187

 

(अयनुद्दीन सोलंकी)
घाटंजी : तालुक्यातील चिखलवर्धा येथे जमआते ईस्लामी हिंद व पारवा पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ईद मिलन व मस्जिद परिचय कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औरंगाबाद येथील जमआते ईस्लामी हिंदचे मौलाना नौशाद उस्मान हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून चिखलवर्धा येथील जामा मस्जीद ट्रस्ट कमेटीचे अध्यक्ष अब्दुल वाजीद अब्दुल गफ्फार हे होते.

मौलाना नौशाद उस्मान म्हणाले की, सर्व धर्मीय ग्रंथामध्ये ईश्वराला जरी वेग वेगळ्या नावाने संबोधले गेले असले तरीही अंतीम उद्देश हा मानव जातीचे कल्याण व्हावे हाच मुख्य उद्देश आहे. महात्मा फुले यांनी निर्मिक हा शब्द वापरुन त्याचे कोणत्याही विशिष्ट देवाकडे कल नसुन संपूर्ण मानव जातीचे निर्माता म्हणून ईश्वराला निर्मिक असे म्हटले आहे. भारत रत्न डाँ. एपीजे अब्दुल कलाम यांनी ईश्वराला Almighty असे संबोधले असुन त्यातुनच भारतिय नागरिकांना संविधानाने आपापल्या धर्माची परंपरा उपासना करण्याची संधी दिली असली तरी अंतिमतः भारत देश हा धर्मनिरपेक्ष देश आहे, हे पटवून दिलेले आहे.

ईद मिलन व मस्जिद परिचय कार्यक्रमात मौलाना नौशाद उस्मान, शेख नईम, मौलाना हाफीज़ साजीद, पोलीस पाटील गणेश कुमरे, सुनिल कुमरे, उपसरपंच आकाश नडपेलवार, राजु बच्चुवार, लक्ष्मण केळझरकर, उल्हास किणाके, रमेश राठोड, सुधाकर चव्हाण, विलास नेवारे, सचिन केळझरकर, प्रभाकर आपतवार, रमेश बहादे, जानबा आत्राम पाटील, विष्णू कणाके, आदीं उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काँग्रेस नेते अब्दुल रफीक पाटील, नसिरुद्दीन पठाण, असदखाँ पाटील, जरीफुल्ला खान, भुट्टो भाई, डॉ. फरहाण पटेल, मुजम्मील पठाण, शेख ईमरान, वसिम पठाण, आसीफ खान, जुबेर पठाण आदींनी अथक परिश्रम घेतले. पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सात ठिकाणी ईद मिलन व मस्जिद परिचय कार्यक्रम पारवा पोलीस स्टेशन कडुन आयोजित करण्यात आला असून पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, कुर्ली बिट जमादार अविनाश मुंढे, पोलीस शिपाई जिवेंदर वाघमारे हे अथक परिश्रम घेत आहे. कार्यक्रमाला हिंदु, मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.