Home जळगाव अलहुदा वेल्फेअर सोसायटी तर्फे साहीर नुसरत यांचा सत्कार

अलहुदा वेल्फेअर सोसायटी तर्फे साहीर नुसरत यांचा सत्कार

192

रावेर ( शेख शरीफ)
जळगाव जिल्ह्यातील अडावद येथील नामांकित “आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थे” मार्फत रविवार ८ मे रोजी डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराचे वितरण करण्यात आले
ज्यामध्ये महाराष्ट्र भरातून विविध क्षेत्रातील मान्यवरांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
रावेर येथील ( कवी) साहीर नुसरत यांना डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या पुर्वी साहीर नुसरत यांची पुस्तक (पेवन लगे खवाब)या पुस्तकाला उर्दू अकेडमी तर्फे पुरस्कार मिळाला आहे.
या पुरस्कार मिळाल्याबद्दल रावेर येथे अलहुदा वेल्फेअर सोसायटी तर्फे साहीर नुसरत यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी संस्था चे अध्यक्ष डॉ वसीम , जुल्कर खान, रहेमान मलीक,अलताफ शेख,सऊद शेख,हकीम खलील, आदी उपस्थित होते.