
यवतमाळ / घाटंजी – येत्या जिल्हा परिषद व नगर पालिका निवडणुका पाहू जाता तसेच शिवसेना पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व जिल्ह्यात माजी मंत्री संजय राठोड यांचे समाजकारणातून राजकारण या कार्यपद्धतीमुळे शिवसेनेकडे प्रवेश घेणाऱ्यांचा विशेष ओढा आहे.या अनुषंगाने चिचघाट येळाबारा ह्या जिल्हा परिषद गटातील विविध पक्षातील मान्यवरांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.

पोलीस पाटील संघटनेचे जिल्हा अध्यक्ष वडगाव पोलीस स्टेशन येथील विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष रुपेश सावरकर व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तोलाराम चव्हाण ह्यांनी आमदार संजय राठोड,शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड यांचे हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.त्यांचे सोबत वडगाव पोलीस स्टेशन येथील ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच दिनेश कटणकर,वडगाव पोलीस स्टेशन येथील सोसायटीचे माजी अध्यक्ष विलासराव ढोबळे,सोसायटी उपाध्यक्ष गिरीश मोडक,राजूभाऊ शिदोडकर,योगेश राठोड,प्रवीण पोटे,संजयभाऊ ठक,रामभाऊ चव्हाण यांनी शिवसेनेत शिवबंधन बांधून प्रवेश केला.ह्या प्रवेशाने चीचघाट येळाबारा ह्या जिल्हा परिषद गटात शिवसेनेची ताकद वाढली आहे.ह्या प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख गजानन डोमाळे, उपजिल्हा प्रमुख किशोर इंगळे,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उपाध्यक्ष संजय देरकर,मध्यवर्ती सहकारी बँक संचालक व जिल्हा परिषद पतसंस्था अध्यक्ष राजुदास जाधव,तालुका प्रमुख संजय रंगे,उपतालुका प्रमुख राजू धोटे,युवासेना उपतालुका युवा अधिकारी दीपक उमरे,निलेश लडके व शिवसेना जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिवसेना प्रमुखांनी सांगितलेल्या ऐंशी टक्के समाजकारण आणि गरज पडेल तेव्हा वीस टक्के राजकारण ह्या तत्वानुसार पुढे काम करणार असल्याचे रुपेश सावरकर आणि तोलाराम चव्हाण ह्यांनी ह्या प्रसंगी सांगितले.











































