Home विदर्भ गायत्री सिड्स ऍग्रो प्रा. लि यवतमाळ चा स्फूर्तीपुर्ण उपक्रम

गायत्री सिड्स ऍग्रो प्रा. लि यवतमाळ चा स्फूर्तीपुर्ण उपक्रम

352

प्रतिनिधी : प्रशांत नाईक

शेतकरी आत्मनिर्भर झाला पाहिजे हाच कंपनीचे एकमेव उद्देश

अमरावती /धामणगांव रेल्वे : तालुक्यातील बोरगाव निस्ताने येथे गायत्री सिड्स ऍग्रो प्रा. लि यवतमाळ तर्फे बोरगाव निस्ताने येथील शेतकरी श्री. रामभाऊजी त्र्यंबकराव निस्ताने यांच्या शेतात उन्हाळी सोयाबीन पिक पाहणी कार्यक्रम संपन्न झाला.
शेतकरी आत्मनिर्भर तयार होने हाच कंपनीचा एकमेव उद्देश असल्याचे मत गायत्री सिड्स ऍग्रो प्रा. लि चे मॅनेजिंग डायरेक्टर मा. किशोरजी मुंदडा यांनी व्यक्त केले.
2022 खरीप हंगामात उन्हाळी सोयाबीन ची लागवड केलेल्या पिकांचे पाहणी करून पिकांबाबत योग्य मार्गदर्शन यावेळी कृषि तज्ञ् यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले. गायत्री सिड्स ऍग्रो प्रा. लि यवतमाळ यांच्या विद्धमाने अश्या शेतकरी सत्राचे आयोजन करण्यात येत असते. कार्यक्रमाला आजू बाजूच्या गावातील असंख्य शेतकरी उपस्थित राहून शेती विषयक मार्गदर्शनाचा लाभ घेतला .तसेच परिसरातील वितरक यावेळी आवर्जून उपस्थित होते.कार्यक्रमाला उपस्थित मा. राम निस्ताने,शशांक निस्ताने, जनार्दन बढिये, सुदेश कदम, विट्टलदास पनपालिया, मुकुंद देशमुख,प्रामुख्याने उपस्थित होते. कंपनी तर्फे किशोरजी मुंदडा(M. D) पाठक सर, मंगेश इंगोले यांनी कार्यक्रमाचे यशस्वी रित्या आयोजन महाराष्ट्रातील मुख्य वितरक रामदेव टेडर्स व गायत्री सिड्स ऍग्रो प्रा. लि यवतमाळ यांच्या संयुक्त विद्धमाने करण्यात आले होते.