Home जळगाव मानवता हेच या देशाचे खरे वैभव : प्रा.सोहेल अमीर शेख यांचे वक्तव्य

मानवता हेच या देशाचे खरे वैभव : प्रा.सोहेल अमीर शेख यांचे वक्तव्य

497

रावेर (शेख शरीफ)
सुप्रीम कॉलनी जळगाव येथील तरुणांनी हिंदू मुस्लिम एकता इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. ज्याच्या अध्यक्षस्थानी जमात-ए-इस्लामी हिंद चे जिल्हा अध्यक्ष श्री. सोहेल अमीर साहब होते. या कार्यक्रमास MIDC चे PSI साहेब, व याकूब अहमद’ राहुल पाटील’ योगेश पाटील, महाराज जी, अब्दुल कदीर पटेल, प्रशांत साहि, राजू पटेल आणि इकबाल भाई इत्यादि विशेष अतिथी म्हणून या कार्यक्रमास उपस्थित होते.


कार्यक्रमाची सुरुवात हाफिज साजिद यांनी पवित्र कुराणच्या पठणाने केली. आणि त्याचा मराठी अनुवाद अकील मन्यार यांनी केला. कार्यक्रमाचे उद्दिष्ट याकूब अहमद याने विषद केले. त्यानंतर पाहुण्यांनी आपले मनोगत मांडले. ज्यात राहुल पाटील साहेब म्हणाले की, आजचे राजकीय लोक हिंदू-मुस्लिम ऐक्य तोडत आहेत. आणि लोकांमध्ये फुट पाडण्याचे काम करत आहे. भारत आपल्या देशाला गंगा-जमनी सभ्यता शिकवतो. म्हणूनच आपण सर्वांनी एकत्र राहायला हवे. हिंदूंनी मशिदीचा, आणि मुस्लिमांनी मंदिराचा आदर केला पाहिजे, असेही श्री.योगेश पाटील म्हणाले. आणि आपण सर्व प्रकारच्या दंगली, भांडणे इत्यादीपासून मुक्त होऊ शकू. महाराजांनी सांगितले की मानवता हा सर्वात मोठा धर्म आहे. सारे चांगले भारतीय आमचे बंधू आमचे हे फुला सारखे आहे. म्हणूनच आपण मानवाच्या कल्याणासाठी कार्य केले पाहिजे. आपल्या अध्यक्षीय भाषणात सोहेल अमीर साहब म्हणाले की, रमजानचा महिना इस्लाम धर्मातील महान व पवित्र असा महिना आहे. यामध्ये उपवासाला खूप महत्त्व आहे. भारताच्या नसां नसा मध्ये प्रेम आणि आपुलकी आहे. प्रसिध्दी माध्यमांच्या अंधश्रद्धेत आपण अडकू नये, आपल्या वृत्त्त पत्र, टी वी चैनल या माध्यमांनी भारताच्या उभारणीसाठी काम केले पाहिजे, असे मला वाटते. आजचा हिंदू-मुस्लिम इफ्तार कार्यक्रम आपल्या संपूर्ण शहरासाठी एक आदर्श ठरेल असा कार्यक्रम आहे. इफ्तार पार्टीला हिंदू-मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि त्यांनी इफ्तारचा खूप आनंद घतला.