Home यवतमाळ विद्यार्थ्यांनी आयएएस होउन जिल्हाधिकारी यांच्या गाडीत बसावे – राज्याध्यक्ष मधुकरराव काठोळे

विद्यार्थ्यांनी आयएएस होउन जिल्हाधिकारी यांच्या गाडीत बसावे – राज्याध्यक्ष मधुकरराव काठोळे

284

 

अयनुद्दीन सोलंकी

घाटंजी – घाटंजी पंचायत समिती अंतर्गत तिवसाळा, सायतखर्डा, झटाळा व जरुर येथील अडतीस विद्यार्थ्यांपैकी अकरा विद्यार्थ्यांनी महादीप परीक्षेमध्ये गौरवास्पद कामगिरी केल्याने ते विद्यार्थी विमानाने प्रवास करत असले तरी त्या विद्यार्थ्यांनी आयएएस होउन जिल्हाधिकारी यांच्या गाडीत बसावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष तथा शिक्षक नेते मधुकरराव काठोळे यांनी केले. ते घाटंजी येथील रसिकाश्रय येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी, शिक्षक सत्कार सोहळा व तालुका शिक्षक मेळावा प्रसंगी बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व पंचायत समितीचे माजी सदस्य अभिषेक ठाकरे, पंचायत समितीचे माजी सभापती रुपेश कल्यमवार, पंचायत समितीचे माजी सभापती शैलेश इंगोले, मोहन जाधव, रणधीर आत्राम, गट शिक्षण अधिकारी चंद्रप्रकाश वाहाने, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष बबनराव राउत, शिक्षक नेते अनंतराव चौधरी, पेन्शनर असोसिएशनचे सचिव घनश्याम पडलवार, केंद्र प्रमुख छाया बन्सोड, केंद्र प्रमुख सुनिल बोंडे आदीं मान्यवर उपस्थित होते.


या प्रसंगी महादीप परीक्षेमध्ये गौरवास्पद कामगिरी केलेल्या तिवसाळा, सायतखर्डा, झटाळा व जरुर येथील विद्यार्थ्यांना भेट वस्तू, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच तेथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, मार्गदर्शक शिक्षक, मार्गदर्शक शिक्षिका आदींचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे घाटंजी तालुका अध्यक्ष दिपक महाकुलकर यांनी केले.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश उदार, पंचायत समितीचे माजी सभापती शैलेश इंगोले, पंचायत समितीचे माजी सभापती रुपेश कल्यमवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व माजी पंचायत समिती सदस्य अभिषेक ठाकरे, शिक्षक नेते अनंतराव चौधरी, गट शिक्षण अधिकारी चंद्रप्रकाश वाहाने, घनश्याम पडलवार आदींचे समयोचित भाषने झाली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन व आभार भास्कर वेट्टी यांनी मानले.