
रावेर (शेख शरीफ)
20 एप्रिल 2022 वार बुधवार रोजी श्री शितल पाटील यांचे श्री मंगलम फार्म बुऱ्हाणपूर रोड रावेर येथे अखिल भारतीय महिला सेना सेक्रेटरी व ज.न.म. प्रवचनकार भूषण सौ. साधनाताई शिंदे यांचे प्रमुख मार्गदर्शनाने महिला मेळावा संपन्न झाला त्या
प्रसंगी उत्तर महाराष्ट्र उपपीठ नाशिक येथील महिला निरीक्षक सौ. अलकाताई खर्डे यांची ही प्रमुख उपस्थिती होती. तसेच
सौ. रंजनाताई पाटील माजी जि.प अध्यक्षा , जि . प माजी सदस्या सौ. नंदाताई अमोल पाटील माजी नपा नगराध्यक्षा सौ.शकुंतलाताई रमेश महाजन , रावेर नपा माजी नगराध्यक्षा’सौ. रियाताई शीतल पाटील माजी नगरसेविका सौ. संगीता ताई भास्कर महाजन , माजी नगरसेविका श्रीमती शारदाताई चौधरी व इतर मान्यवर यांनी दिप प्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन केले.
सदर मेळाव्यात सांस्कृतिक कार्यक्रम भारुड, नृत्य व भगवद्गीतेच्या 12 व 15 व्या अध्यायाचे पठण करण्यात आले.
मेळावा यशस्वी होण्यासाठी जिल्हा निरीक्षक श्री. अरविंद जी मोरे साहेब, पीठ सदस्य श्री. डिगंबर टोके साहेब, जिल्हाध्यक्ष श्री. संजय महाजन साहेब, महिला जिल्हाध्यक्षा सौ. नीलाताई सोनवणे यांनी उपस्थित भाविकांना अध्यात्मिक व सद्गुरु सेवेविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जिल्ह्यातील चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ व जामनेर या तालुक्यातून समस्त महिला भगिनी व भाविक गुरुबंधू उपस्थित दर्शनीय होती
सर्व जिल्हा कमेटी,तालुक्याचे तालुका अध्यक्ष, महिला तालुकाध्यक्ष, युवा अध्यक्ष व संग्राम सेना प्रमुख व आजी – माजी पदाधिकारी या सर्वांनी मोलाचे परिश्रम घेतले.
सूत्रसंचलन सौ.मनीषा ताई नेवे, भुसावळ यांनी तर आभार प्रदर्शन ज.न.म. प्रवचनकार हेमलताताई टोके यांनी केले.
कार्यक्रमासाठी देणगी, निधी व अन्नदान विविध प्रकारच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सेवा देणाऱ्या जिल्ह्यातील सर्व दानशूर दात्यांचे जिल्हाध्यक्ष श्री.संजय विठ्ठल महाजन यांनी शब्द सुमनांनी आभार व्यक्त केले.











































