
येणाऱ्या रामनवमी उत्सव व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर शांतता राखून सहकार्य करावे – सपोनि निरीक्षक भालचंद्र तिडके.

प्रतिनिधी – मजहर शेख,नांदेड
सारखणी – सिंदखेड पोलिस स्टेशन अंतर्गत सारखणी व वाई बाजार येथे आगामी काळात येणाऱ्या रामनवमी उत्सव व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर नांदेड चे पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या आदेशाने सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र तिडके यांनी सारखणी येथील किनवट रोड, माहूर रोड, मांडवी रोड ,तसेच गावातून पथसंचलन करण्यात आले.या उत्सवाच्यादरम्यान समाजकंटकाकडून कायदा व सुव्यवस्थाला बाधा पोहोचवली जाऊ नये यासाठी पोलीस कर्मचारी सज्ज झाली आहे.या पार्श्वभूमीवर दिनांक ९ एप्रिल रोजी सारखणी वाई बाजार येथे सिंदखेड पोलोसांच्या वतीने पथसंचलन करण्यात आले. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र तिडके,जमादार पठाण,गजानन नंदगावे, शेंडे,फुलारी,चव्हाण, तौफिक खान,महेश कोटूरवार यासह पोलिस महिला कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सर्व नागरिकांनी येणाऱ्या रामनवमी उत्सव व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर शांतता राखून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र तिडके यांनी केले.











































