
प्रतिनिधी:( रवि आण्णा जाधव )
देऊळगाव राजा:- शहरात रंगलेल्या देऊळगाव राजा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात छत्रपती संघाचा पराभव करत स्टायलो संघाने विजेते पदाचा मान पटकावला आहे.
छत्रपती डिपीएल, साहेब फाउंडेशन,अजय शिवरकर मित्र मंडळ, दीपक बोरकर मित्रमंडळ यांनी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते, उत्कृष्ठ नियोजन, प्रत्येक सामन्यात खिलाडूवृत्ती कायम राहिल्याने देऊळगाव राजा प्रीमियर लीग यशस्वीरीत्या सिव्हील कॉलनीतील रामाणे स्टेडियमध्ये पार पडली. उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत स्टायलो संघाने फायनल मध्ये दिमाखात प्रवेश केला होता, सेमीफायनल मध्ये छत्रपती व वीरा या दोन संघात सामना झाला, यामध्ये छत्रपती संघाने विजय मिळवला, फायनल मध्ये छत्रपती संघाने प्रथम फलंदाजी करतांना आठ षटकात ६६धावा करुन स्टायलो संघासमोर ६७ धावांचे आव्हान ठेवले, प्रत्युत्तरात स्टायलो संघाने सात षटकात ६८ धावा करून छत्रपती संघाचा पराभव करून प्रथम बक्षीस पटकावले, तर छत्रपती संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले,
५१, हजार रुपयांचे प्रथम बक्षीस डॉ.रामप्रसाद शेळके व शंकर पालकर सर मातृदर्शन अर्बन यांच्या वतीने ठेवण्यात आले होते, डॉ. रामप्रसाद शेळके, ज्योतिरादित्य शेळके यांच्या हस्ते बक्षिस व ट्रॉफी स्टायलो संघाला देण्यात आली,
३१ हजार रुपयांचे द्वितीय बक्षीस मारोती शिवरकर अध्यक्ष शिक्षक सहकारी पतसंस्था, माजी नगरसेवक अजय शिवरकर यांच्या वतीने होते, उपविजेत्या छत्रपती संघाला मारोती शिवरकर व अजय शिवरकर यांच्या हस्ते बक्षिस व ट्रॉफी देण्यात आली, १५ हजार रुपयांचे तृतीय बक्षीस शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दीपक बोरकर व दत्ता पोंदे यांच्या वतीने होतें, वीरा संघाला दिपक बोरकर यांच्या हस्ते बक्षिस व ट्रॉफी देण्यात आली
शंकर अंबादास शिवरकर व पदाधिकाऱ्यांनी क्रिकेट स्पर्धेत अथक परिश्रम घेतले, मॅन ऑफ द सिरिजचे बक्षिस छत्रपती संघाचे ऑल राऊंडर खेळाडू अरूण मुंढे सर यांना ऍड रामेश्र्वर रामाणे, नासेरभाई, पत्रकार अर्जुनकुमार आंधळे यांच्या हस्ते देण्यात आले,
अंतिम सामना व पारितोषिक वितरण प्रसंगी डॉ.रामप्रसाद शेळके, मारुती शिवरकर, दीपक बोरकर, माजी नगरसेवक अजय अंबादास शिवरकर, पत्रकार अर्जुनकुमार आंधळे, शंकर पालकर सर, दत्ता पोंदे, शंकरअण्णा शिवरकर, संभाजी तात्या हटकर ,राजू मांटे ,अँड.रामेश्वर रामाणे साहेब, नासेरभाई जनता सेवा,पांडुरंग बाबुराव शिवरकर, पत्रकार संतोष पाटील बनकर, मुन्ना भाई ठाकूर, राजू भाऊ पंडित, शुक्राचार्य टेकाळे, रामविजय नरोडे, बादल रूपारेलीया, आकाश कासारे, विठ्ठल पावले, संतोष उगले, नौशाद भाई पठाण, अज्जूशेठ जनता,किशोर शिवरकर,दुर्गा हाटकर, जानराव हाटकर, यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. अंतिम सामना बघण्यासाठी रामाणे स्टेडियमवर प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी केली होती.











































