Home वाशिम पोलीस स्टेशन रिसोड पथकाने दोन तासात विनयभंग करणाऱ्या आरोपीस अटक करून दिला...

पोलीस स्टेशन रिसोड पथकाने दोन तासात विनयभंग करणाऱ्या आरोपीस अटक करून दिला पिडीतास न्याय

281

 

वाशिम:-दिनांक १९/०३/२०२२ रोजी फिर्यादी नामे संजय गुणवंतराव देशमुख रा. मोठेगाव यांनी पोलीस स्टेशन रिसोड येथे येवुन रिपोर्ट दिला की, दि.१६/०३/२०२२ रोजी सायंकाळी ०६.३० वा.चे सुमारास फिर्यादी यांची ६ वर्षाची मुलगी हीचे त्याचे शेजारी राहणारा आरोपी नामे सुधीर गुणवंतराव देशमुख रा. मोठेगाव याने पिडीत ही टयुशन वरून घरी येत असतांना आरोपीच्या नविन घराचे बांधकाम चालु असलेल्या ठिकाणी तिला उचलुन घरा संडास जवळ घेवुन गेला. व तीच्या पप्या घेतल्या व तिला खाली उतरवुन तिची चडडी खाली ओढली.तेव्हा पिडीत मुलगी म्हणाली की, चडडी काढु नका. तर आरोपी म्हणाला काही होत नाही. मी तुला रोज चॉकलेट देतो. कोणाला काही सांगु नको. तेव्हढयात पिडीत मुलीला आवाज देत तिची मैत्रीण आत आली तेंव्हा आरोपी पिडीतीचे मैत्रीणीला म्हणाला, तु जा पुढे. ती मागुन येते. तेव्हढयात पिडीत मुलगी तेथुन पळुन घरी गेली व घडलेला प्रकार तिच्या आई वडिलांना सांगीतला वरून पो.स्टे. रिसोड येथे अपराध कमांक १८०/२०२२ कलम ३६३, ३५४ अ, ३५४ ब, भा.द.वी. सह कलम ८.१२ पोस्को प्रमाणे गुन्हा दि.१९/०३/२०२२ रोजी १३.४६
वाजता दाखल करण्यात आला.
सदरचा गुन्हा संवेदनशिल असल्याने सदर गुन्हयाची माहीती मा. पोलीस अधिक्षक सो, श्री बच्चन सिंह मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो, श्री सुनिल पुजारी, यांना देवुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी देवेद्रसिंह ठाकुर पोलीस स्टेशन रिसोड यांनी विविध पथके तयार करून आरोपीस तात्काळ अटक करण्यात अाली.सदर आरोपी विरूध्द वेळेत दोषारोप पत्र मा.न्यायालयात दाखल करण्याची तजविज ठेवली आहे. वाशिम जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे सर्व नागरीकांना आव्हान करण्यात येते की, त्यांनी आपल्या तकारी हया निर्धोकपणे संबंधीत पोलीस स्टेशनला दयाव्यात त्यावर तात्काळ कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.सदर कारवाईत मा. पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनिल पुजारी, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकुर, सहा, पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ,महेंद्रकुमार गवई, पो.उप.नि. विलास मुंढे, ना.पो.कॉ. रतन बावस्कर ब.नं. २२६, ना.पो.कॉ. रमेश गोडघासे ब.. ११४, ना.पो.कॉ. सतिष मुसळे ब.नं. ११८९, यांनी सहभाग नोंदवील. नमुद गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ हे करित आहेत.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206