Home बुलडाणा संत गाडगे बाबांनी माणसात देव पाहिला शिकवले – प्रा. भगवान राईतकर

संत गाडगे बाबांनी माणसात देव पाहिला शिकवले – प्रा. भगवान राईतकर

228

 

देऊळगाव माळी .प्रतिनिधी (कैलास राऊत) ता. २०. देवाच्या अस्तित्वाला गाडगेबाबा नकार देत नव्हते पण, चराचरात रममाण झालेल्या देवाला बंदिस्त करण्याच्या वृत्तीला त्यांनी विरोध केला. पशुबळी, नवस-सायास, पूजाअर्चा, अंधश्रद्धेला तसेच अंगात येणाऱ्या देवादिकांना त्यांचा विरोध होता.

शेती नको, काम नको, काहीच नको. त्या देवापुढं उदाधूपाचा एक डोंगर धुपटला की, आपोआप शेती पिकून तयार, जमेल का ? हे असं केलं तर, असा रोकडा सवाल ते कीर्तनात करीत असत. समाजसुखासाठी अविरत श्रमसाधना हेच गाडगे बाबांचे अभंग होते. बाबांनी श्रम आणि सेवा, श्रम आणि संस्कार, श्रम आणि पूजा, श्रम आणि अभिषेक, श्रम आणि अभंग यांची घातलेली सांगड म्हणजे समाजसुखातून ईश्वरशक्तीचा समाजोद्धार हाच बाबांच्या श्रमसंस्कृतीचा मूलमंत्र होता. बाबांसारख्या एका निरक्षर माणसाच्या मनात स्वयंप्रेरणेतून समाजोद्धाराची एवढी समर्पित भावना निर्माण होते . बाबांचे सारे जीवनच श्रमसाधनेच्या मूल्यसंस्कारांचा एक आदर्श वस्तुपाठच बाबांनी घालून दिला म्हणून त्यांचा भक्तीभावाला कधीच विरोध नव्हता , तर गाडगेबाबांनी माणसात देव पाहायचे समाजाला शिकवले असे प्रतिपादन प्रा. भगवान राईतकर यांनी विवेकानंद विज्ञान महाविद्यालय, विवेकानंद नगर, अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबीराच्या दत्तक ग्राम देऊळगाव माळी येथे आयोजित केलेल्या बौद्धिक सञाच्या संत साहित्य या विषयाच्या व्याख्यानमालेत केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर मगर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून व्याख्याते प्रा.भगवान राईतकर ,रा.से‌. यो .कार्यक्रम अधिकारी प्रा.अमोल शेळके ,महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.कु.मधुरा सातपुते, पत्रकार कैलास राऊत ,अमोल गिर्हे, विजय मगर, हे होते , कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश गायकवाड केले .यावेळी संत गाडगेबाबा खरेखुरे मानवतेचे देवदुतच होते, बाबांनी देवापुढे हात जोडून प्रार्थना करीत बसण्यापेक्षा हातात खराटा घेऊन सर्वत्र स्वच्छतेचा सुगंध पसरला असे प्रा. अमोल शेळके यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले यावेळी पत्रकार कैलास राऊत यांनी आपल्या मनोगतात संत गाडगे महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.साक्षी वाहेकर ने केले तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर मानवतकर यांनी मानले , कार्यक्रमाला शिबिरात सहभागी झालेले सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच गावातील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.