Home बुलडाणा स्मशानभूमीत स्वच्छता व वृक्षारोपण करून रासेयो च्या विद्यार्थ्यांनी केली होळी साजरी ..

स्मशानभूमीत स्वच्छता व वृक्षारोपण करून रासेयो च्या विद्यार्थ्यांनी केली होळी साजरी ..

438

 

देऊळगाव माळी प्रतिनिधी ( कैलास राऊत)ता.१७. युवकांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व घडविण्याचे कार्य शिक्षण क्षेत्राद्वारे होते परंतु प्रभावी व्यक्तिमत्त्व घडवत असताना तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाण व सेवाभाव निर्माण करण्याचे कार्य महाविद्यालयीन स्तरावर राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाद्वारे होत असते.

तरुणांमध्ये समाजसेवेची जाण व्हावी याच हेतुने विवेकानंद विज्ञान महाविद्यालय विवेकानंद नगर अंतर्गत आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर दि. १४ मार्च २०२२ते २१ मार्च २०२२ दत्तक ग्राम देऊळगाव माळी येथे आयोजित केले असून महात्मा गांधींचा ‘खेड्याकडे चला’ हा विचार घेऊन देऊळगाव माळी गावांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष उन्हाळी श्रमसंस्कार शिबिरांमार्फत निर्मलग्राम, सर्वांगीण व शाश्वत ग्रामविकास, चर खोदणे, रस्ते बांधणी, पाणी अडवा पाणी जिरवा, वृक्षारोपण, रक्तदान आदी कार्य श्रमदान, पथनाट्य, रॅली, उद्बोधकचर्चा, शिवारफेरी, गावकरी संवाद या माध्यमांतून समाजाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात युवाशक्ती वा ऊर्जास्त्रोत पुरविण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सुरू असुन होळी या राष्ट्रीय सणाला अनेक ठिकाणी वृक्षतोड करून होळी पेटवुन पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्यात येते परंतु सामाजिक परिस्थितीचे व निसर्ग संवर्धनाची जाण ठेवून विवेकानंद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या ५० विद्यार्थ्यांनी देऊळगाव माळी येथे श्रमदान सत्रामध्ये येथील स्मशानभूमीत स्वच्छता मोहीम राबवून, परिसर स्वच्छता ,व याठिकाणी पंधरा ते वीस शोषखड्डे पाणी अडवण्यासाठी खोदले व स्मशानभूमीच्या मोकळ्या जागेत जांभळीच्या झाडांचे वृक्षारोपण करून सामूहिकरीत्या होळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला व वृक्ष संवर्धन व पर्यावरण,व परिसर स्वच्छताचा संदेश विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून दिला, यावेळी महाविद्यालयाचे रा.से.यो कार्यक्रम अधिकारी प्रा.अमोल शेळके ,महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.कु.मधुरा सातपुते, पञकार कैलास राऊत ,पुरोषोत्तम भराड,संजय काटोले,व विद्यार्थी प्रतिनिधी आदित्य थेटे विद्यार्थीनी प्रतिनिधी कु.ऋतुजा इंगळे यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजचे पन्नास विद्यार्थी उपस्थित होते.