Home विदर्भ आरतीताई कारंजेकर एक उमलते प्रभावी व्यक्तीमत्व…!

आरतीताई कारंजेकर एक उमलते प्रभावी व्यक्तीमत्व…!

288

पोलीसवाला ब्युरो रिपोर्ट

वर्धा –  आरतीताई कारंजेकर यांच्याशी चार वर्षांपासून संपर्क आला.
परंतु आरतीताई एवढ्या प्रभावीपणे समाजाप्रती मत मांडू शकेल असे वाटले नाही. कारण आरतीताई नेहमी पडद्यामागे राहुन समाजकारण करीत होत्या.
त्यांची जेव्हा गणराज व्यक्तिमत्व विकास केंद्रामधे जोसबा प्रकल्प संचालक सिमाताई खिरोडकर यांच्या सोबत भेटण्याचा योग आला तेव्हा त्यांनी गणराज व्यक्तिमत्व विकास केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी जे सडेतोड मत मांडले त्याचेवरून असे वाटले की आरतीताई खरच व्याख्याता आहेत. तिथूनच खरी त्यांची कारकीर्दला सुरुवात झाली.
महींलानी व्यक्तिमत्व विकासासोबतच सर्वच क्षेत्रात उतुंग भरारी घेण्याकरिता सकारात्मक उर्जा निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे महिलांना आपल्या प्रशिक्षनातुन सागितले.
सकारात्मक राहील्यास यश नककीच पदरी पडेल या विचारावर महिलांनी ठाम राहिल्यास स्त्रिशक्तीचा पराभव कधीच होणार नाही असे सौ.आरतीताई कारंजेकर यांनी महिलांना पटवून दिले.
स्त्रीने आपल्या कूटुंबाचे व समाजाचे आपण काहितरी देणे लागतो याची जाणिव असणे खुप गरजेचे आहे. या करिता सौ.आरतीताई कारंजेकर महीलांना कुमरिका बालिकेला व्यक्तीमत्व विकासाच्या माध्यमातून सक्षम बनविण्या करिता कार्य करीत आहे.
महिलांनी इतर जबाबदारी बरोबरच घरातील वृद्ध व्यक्तीची काळजी घेवून वृद्धांना सन्मानजनक वागणूक देण्याची गरज असल्याचे मत आरती कारंजेकर यांनी अडेगाव येथील महिला स्नेहमिलन कार्यक्रमात मत व्यक्त केले. जीवन विकास सोसायटी सेवाग्राम संस्थेच्या वतीने अडेगाव येथील शनिवारी बारा मार्च रोजी महिला स्नेहमिलन आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
पुढे बोलतांना आरती कारंजेकर म्हणाल्या की, आपण समाजात व कुटुंबात वावरताना मोठ्याचा आदर करून कोणाचे मन दुखनार नाही याचे भान ठेवावे, आपण जे पेरू तेच उगवेल त्यामुळे काय योग्य पेरायचे हे पहिलेच ठरविले तर योग्य निर्णय घेण्यास अडचण ठरणार नाही. या वाक्याने आरतीताई यांनी उपस्थित महिलांना भावनिक केलेत.
या आरतीताई यांच्या कार्याला सलाम.!

सौ.रजंनाताई मानकर