
रावेर ( शेख शरीफ)
महिला दिनाचा औचित्य साधुन उर्दू केंद्र शाळेत आज मा.शिक्षण विस्तार अधिकारी विलास कोळी साहेबांचे हस्ते शाळेतील विद्यार्थिनी व महिला शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार व सन्मान करण्यात आले.यावेळी साहेबांनी शाळेची पाहणी केली.शाळापुर्ण डिजिटल केली असून शाळेत एकुण अकरा प्रोजेक्टर, एक इंटरएक्टिव्ह डिजिटल बोर्ड, व्हर्च्युअल टी व्ही, विज्ञान लॅब व पुर्ण इमारती ला शासकीय पत्रकानुसार रेन हार्वेस्टिंगव खाजगी ट्युबवेल करण्यात आली.आहे.विद्यार्थी पट ५१० असुन एकुण अकरा शिक्षक कार्यरत आहेत.शाळा हि केंद्रीय शाळा असुन विविध उपक्रमे इथे राबविले जातात. शाळेत आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रम अंतर्गत कला चित्र रंगभरण स्पर्धा,प्रश्न मंजुषा, स्वच्छता अभियान दिंडी उपक्रम पाहून साहेबांनी सर्व शिक्षकांचे कौतुक केले व शाळा दत्तक घेऊन अजुन मुलांचे भवितव्य उज्वल व चांगले करणे साठी प्रयत्न करण्याचा मानस दाखवले सोबत राहुन अपेक्षित बाबींना पुर्ण करण्यात सर्वांचा सहकार्य करीन आश्वासन दिले .सर्व शिक्षकांचे सहकार्याने शाळा आज आदर्श शाळा कडे वाटचाल करत असुन अ.नईम जनाब, अमीनुद्दीन जनाब, मलक अनीस सर , शेख कमालोद्दिन सर, मो. रफीक, मो. शाकीर, तस्लीम बानो, नजमा तडवी, गजा़ला तबस्सुम, बोहरी रिज़वाना, सर्व शिक्षक परिश्रम घेत आहे.तसेच शाळेला सर्व वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी व समाज सेवकांचा सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे.











































