Home विदर्भ सर्पदंश झाल्याने एकुलता एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू

सर्पदंश झाल्याने एकुलता एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू

289

 

वर्धा -आर्वी तालुक्यातील सालफळ या गावात काल संध्याकाळी अत्यंत दुःखद घटना घडली,वडील मरण पावल्यामुळे मामाच्या शेजारी राहायला आलेल्या एक 14वर्षीय मुलाचा विषारी सापाने चावा घेतल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला.मृत दुर्दैवी बालकाचे नाव ::प्रथमेश प्रफुल वानखडे वय 14वर्ष रा. सालफळ ता. आर्वी जी. वर्धा असे असून तो शेजारी गाव असलेल्या निजामपूर या गावी नातेवाईकांच्या घरी वाढदिवसाच्या कार्यक्रमाला जाताना घाईघाईत जवळ असलेली सायकल गावाशेजारील गाईच्या गोठ्यात सायकल ठेऊन दिली. कार्यक्रम आटोपून प्रथमेश रात्री 8वाजता गावात परत आला व लगेच सायकल घ्यायला गाईच्या गोठ्यात गेला. गोठ्यात अंधार असल्यामुळे सायकल शेजारी असलेल्या सापाने प्रथमेश च्या पायाला दंश केला. पाय झटकल्यामुळे शेजारी असलेला लोखंडी टिन पण त्याच्या पायाला लागला. त्यामुळे सर्पदंश झाल्याचे उशिरा निदर्शनास आले.त्यामुळे दवाखान्यात न्यायला उशीर झाला व प्रथमेश या मुलाला उपचाराविणाच रस्त्याने च मृत्यू ने कवटाळले. पतीच्या निधणानंतर एकुलता एक आधार असलेला प्रथमेश गेल्याने आईवर व बहिणीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण गावात शोककळा पसरली असून प्रत्येक गावकरी प्रथमेश च्या अश्या अकाली जाण्याने हळहळ व्यक्त करत आहे.

प्रतिनिधी :: प्रशांत नाईक