
देऊळगावमाळी प्रतिनिधी (कैलास राऊत) ता.२४. देशातील प्रत्येक तरुणाच्या मनात कुठे ना कुठे रतन टाटा, मुकेश अंबानी, स्टीव्ह जॉब्स दडलेला असतो. प्रत्येकाचीच मोठी स्वप्ने असतात. सगळेच ती पूर्ण करण्यात यशस्वी होतात असेही नाही. पण म्हणून त्यांचे प्रयत्न कधीच थांबत नाही. आपल्या आजूबाजूचे अनेक तरुण स्वतःचे व्यवसाय सुरु करुन त्यांच्या मोठ्या स्वप्नांची बीजे रोवत आहेत. परंतु काही बेरोजगार तरुणासाठी व्यवसाय सुरु करणे एवढे सोपे नाही. हा रस्ता प्रचंड संयम पाहणारा आणि कष्टदायक असतो. असे विचार येतात परंतु स्वतःच्या क्षमतेबद्द्ल मनात कितीही शंका डोकावून गेल्या तरी नेहमी प्रोत्साहीत राहून प्रयत्न करत राहायला हवे , परंतु अनेक तरुणांना उद्योग व्यवसाय उभा करत असताना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते किंवा योग्य मार्गदर्शन मिळत नाही यामुळे अनेक तरुण बेरोजगार राहतात यामुळेच मेहकर तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या देऊळगाव माळी येथे गेल्या काही वर्षांपासून अनेक बेरोजगारांना व्यवसायांद्वारे आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करता यावी यासाठी शिवसेनेचे युवा नेते उद्योजक प्रकाश डोंगरे तथा मित्रमंडळ सामाजिक कार्यासोबतच बेरोजगार तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे ,

अनेकांना उद्योग व्यवसाय उभा करण्यासाठी मार्गदर्शन व आधार देण्याचे काम प्रकाशभाऊ डोंगरे व मित्र मंडळाच्या माध्यमातून करण्यात येत आहेत त्यातीलच एक भाग म्हणून देऊळगाव माळी येथे नुकतेच माऊली मल्टी सर्व्हिसेस व जनरल स्टोअर्सचे उद्घाटन प्रकाश डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले .गावातील आकाश भराड व वैभव वाढे या दोन बेरोजगार तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता गावातच माऊलीमल्टी सर्विसेस व जनरल स्टोअर्सच्या माध्यमातून रोजगार उभा केला त्यासाठी प्रकाश भाऊ डोंगरे व मित्र मंडळाने मार्गदर्शन व आधार देण्याचे काम केले त्या उद्घाटन प्रसंगी तरुणांनी नोकरीची संधी शोधत असतांनाच स्वतःचा उद्योग व्यवसाय उभा करून आपल्या कुटुंबाला हातभार लावावा , कोरोनामुळे अनेक तरुणांच्या नोकऱ्या केल्या लाखो तरुण बेरोजगार झाले म्हणून बेरोजगार तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता उद्योग व्यवसायाकडे वळावे असे आव्हान शिवसेनेचे युवानेते प्रकाश डोंगरे यांनी केले या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्रकाश डोंगरे बोलत होते ,यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन पोलीस उपनिरीक्षक स्वातीताई भराड (मगर), शिवाजी लोणकर पत्रकार कैलास राऊत ,पत्रकार राजेश मगर ,संतोष लोणकर ,ऋषी चाळगे, पंकज लोणकर, परमेश्वर जारे,गणेश बळी, रामेश्वर भराड महाराज ,केशव मगर व प्रकाश भाऊ डोंगरे मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी यासह गावातील असंख्य मान्यवर व गावकरी उपस्थित होते.











































