Home जळगाव जिजाऊ ब्रिगेड रावेर च्यावतीने आगळीवेगळी शिवजयंती उत्सव साजरा.

जिजाऊ ब्रिगेड रावेर च्यावतीने आगळीवेगळी शिवजयंती उत्सव साजरा.

211

रावेर (शेख शरीफ)
शिवजयंतीच्या निमित्ताने सर्व महाराष्ट्र सह देशात विदेशात ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण करून अर्पण करण्यात येत,वा रक्तदान शिबिर, फळ वाटप, अन्न दान, अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांनी शिवप्रेमी हे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात.
पण रावेर तालुक्यातील जिजाऊ ब्रिगेड च्यावतीने आगळीवेगळी शिवजयंती साजरी करण्यात आली.यात विशेष म्हणजे सर्व जिजाऊ ब्रिगेड महिला सदस्यांनी लग्न कार्य सारखी साजवट करून घरात, अंगणात रांगोळी काढून आपल्या परिसरात आंनदी वातावरण सर्व महिला एकत्र येवून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव असे राजे आजवरच्या इतिहासात आहेत कि, त्यांच्या दरबारात महिला नाचली नाही, प्रत्येक महिलेला आई बहीण चा दर्जा दिला गेला आहे, म्हणजेच स्त्री सन्मानाने जगली म्हणून ह्या महिलांनी त्या एका विचाराने प्रभावित होऊन शिवजयंती औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती आपल्या मोठा आदर सजावटीच्या पाळण्याचे फुलहार सजावटी ने स्वयम् प्रेरणादायी जिजाऊ मातेचे आभार मानून त्यांनी चक्क शिवबाच्या जन्मदिनी पाळणा हलवून भक्ती गीते गाऊन आदर्श निर्माण केला.
या अनोख्या उपक्रमांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.