
जयंती उत्सव कार्यक्रमात आ. सौ. सुलभाताई खोडके यांची ग्वाही…!

मनिष गुडधे
अमरावती , दि. 21 फेब्रुवारी सर्वांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य म्हणून आपली अविरतपणे वाटचाल सुरू ठेवली. त्यांच्या लोककल्याणकारी कार्यापासून प्रेरणा घेऊन आपणास सामाजिक प्रगती व विकास साधायचा आहे. शिवटेकडी चे सौंदर्यीकरण करीता शासन दरबारी प्रस्ताव सादर करीत आपण जास्तीत जास्त निधी आणून हे काम पूर्ततेकरिता आपण निश्चितच प्रयत्न करीत याला मूर्त रूप देऊ. याकरिता आपण प्रस्ताव द्यावा. शिवटेकडी सौंदर्यीकरण व संवर्धन करिता आपण सदैव शिवप्रेमींसोबत आहोत. असा विश्वास व्यक्त करित आमदार सौ .सुलभाताई खोडके यांनी याकरिता पर्याप्त निधी उपलब्ध करून देण्याची सुद्धा ग्वाही दिली. सार्वजनिक शिव जयंती उत्सव समितीचे वतीने आयोजित शिव जयंती जन्मोत्सव कार्यक्रमात त्या बोलत होत्या. सर्वप्रथम आमदार महोदयांसह मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. यावेळी आ. सुलभाताई खोडके यांनी शहरवासीयांना शिव जयंतीच्या शुभेच्छा देत शिव चरित्र हे समाजात रुजविण्याचा आवाहन केले . यावेळी आयोजकांचे वतीने पुरुषोत्तम खेडेकर द्वारा लिखित प्रेरणा स्थान जिजाऊ नामक पुस्तक व गुलाबपुष्प देऊन आमदार सौ. सुलभाताई खोडके यांचे स्वागत करण्यात आले.कार्यक्रमा दरम्यान मराठा सेवा संघाचे वतीने शिवटेकडी परिसराची देखभाल व संवर्धन करणाऱ्या सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी मराठा सेवा संघ , जिजाऊ ब्रिगेड , संभाजी ब्रिगेड , सार्वजनिक शिव जयंती उत्सव समिती चे सर्व सदस्य व पदाधिकारी तसेच बहुसंख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.










































