
तिन महिन्याच्या कीराना सामानाची दिली भेट..!
नारायणपूर प्रतीनिधी – बंडु बन
वर्धा – समुद्रपुर तालुक्यातील नारायणपूर येथील श्री राजु निखाडे वय 40 वर्ष हा जन्मता दोन्ही डोळ्यांनी आंधळा असुन त्याला पत्नी व दोन मुले आहेत त्याला असलेल्या अपंगत्वावर अजुनही शासनाच्या अधिकारी वा लोकप्रतिनिधी कोनीही लक्ष दिले नसल्याचे दिसून येते कोरोना काळात शासनाच्या मोफत धान्य योजनेचा एकमेव आधार मिळाला असे राजुने सांगितले त्यातच राजुच्या अडचणी बद्दल गोविंदपुर गट ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ शारदा तुमराम यांना माहिती मिळाली तर त्यांनी अंधत्व असलेल्या राजुच्या कुटुंबाची भेट घेतली व अडचणी बद्दल विचारणा केली व अंदाजे तीन महिने पुरेल एवढे किराणा सामान घेऊन दीले सरपंच सौ शारदा तुमराम यांनी केलेल्या मदतीबद्दल राजुने सरपंचाचे आभार मानले आहेत एवढे झाले तरी अंधत्व असलेल्या राजुला शासनाच्या योजना चा लाभ केव्हा मिळणार हे एक न सुटनारे कोडे आहे.










































