Home नांदेड वायफनी येथे शिवस्मारकाचे भूमिपूजन …!

वायफनी येथे शिवस्मारकाचे भूमिपूजन …!

388

 

प्रतिनिधी – मजहर शेख

नांदेड/माहूर,दि : २० :- रयतेचे राजे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराज शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून पुनर्वसित गाव वायफनी येथील स्थानिक गावकऱ्यांच्या इच्छेनुसार गावातील तरुणांनी पुढाकार घेत दि. 19 फेब्रुवारी 2022 रोजी अतिशय हर्षोल्हासात व आनंदात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली. प्रसंगी जी. प. सदस्य समाधान जाधव, सरपंच नारायण खूपसे, उपसरपंच पुष्पाबाई सूर्यवंशी, तंटा मुक्ती अध्यक्ष माणिकराव पाटील, जेष्ठ नागरिक, महिला वर्ग, तरुण मंडळ यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. ह्या आनंदाच्या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी परिसरातील सर्वच गावचे तरुण शिवभक्तांनी हजेरी लावली होती.


कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी तन्मय कदम, संजय सीडाम,
स्वप्नील जाधव, राहूल बोयवारे, देवानंद बंडेवड,राहूल सूर्यवंशी, सुनिल सिदाम, शिवा ठाकरे, उदय जाघव, हर्षल राउत, अनिकेत सूर्यवंशी, ओम कदम, अनिल काळे, ओम सूर्यवंशी, गणेश मुंडे, अनंता मुंडे, आदींनी मेहनत घेतली….