Home विदर्भ शिवक्रांती यंग पॅंथर ग्रुप येरला येथे शिवजयंती साजरी

शिवक्रांती यंग पॅंथर ग्रुप येरला येथे शिवजयंती साजरी

190

प्रतिनिधी – हिंगणघाट ( येरला )

वप्धा –  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 392 व्या जयंतीनिमित्त येरला येथे शिवजयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते दिनांक 18 फेब्रुवारी ला स्पर्धेचे आयोजन पार पाडले 19 फेब्रुवारीला गावातील प्रतिष्ठित नागरिक बाळकृष्ण चाफले यांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आणि शांतपणे प्रभात फेरी काढून शिवाजी महाराजांचा जयघोष करत प्रभात फेरी काढण्यात आली आणि स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले व इयत्ता 1 ते10 या वर्गात प्रथम क्रमांक घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयंत भाऊ कातरकर शिवक्रांती यंग पॅंथर ग्रुप चेआयोजक अनिल तागडे मार्गदर्शक पत्रकार प्रमोद झिले अध्यक्ष अमित वावरे, सुशील भगत,ग्रा.पं सदस्य संतोष मडावी,रवी चांदेकर,रमेश किन्नाके,निलेश बेंदले,चेतन साळवे, दीपक भगत,संदेश बेंदले, बबनराव जोगी,कैलास जोगी, भारत चालखूरे मारोती ताजणे,रत्नाकर वावरे,भास्कर भगत, प्रकाश जोगी, बापूराव कांबळे सूदामजी मेश्राम,कैलास वानखेडे,सूरेश अवाढ,तेजस नगराळे,अपील भगत आदीत्य कांबळे आणि शिवक्रांती यंग पॅंथर ग्रुपचे सर्व सदस्य व गावातील नागरिक उपस्थित होते.