Home मराठवाडा कुणी वंदा अथवा निंदा शिवसेना सोडली नाही,बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेला एकनिष्ठ शिवसैनिक...

कुणी वंदा अथवा निंदा शिवसेना सोडली नाही,बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेला एकनिष्ठ शिवसैनिक ज्ञानेश्‍वर आर्दड

1079

 

घनसावंगी- लक्ष्मण बिलोरे

स्वार्थासाठी सहा-सहा महिने किंवा एका – एका वर्षाला या पक्षांतून त्या पक्षात पळणारे अनेक नेते,कार्यकर्ते आपण बघितले आहेत, बघत आहोत. जनहित तर सोडा, पण फक्‍त स्वतःची तुंबडी भरविण्यासाठी नेत्यांची लाचारी करणार्‍या कार्यकर्त्यांची संख्या फार मोठी आहे.

परंतु शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरीत असलेले , त्यांच्यावर निस्सिम, निःस्वार्थ प्रेम करणारे सच्चे कार्यकर्ते देखील या पक्षात आहेत, हे आपल्याला दुर्लक्ष करून चालता येणार नाही. याबाबत एकनिष्ठ शिवसैनिक ज्ञानेश्‍वर बालाजी आर्दड यांचे जिवंत उदाहरण द्यावे लागेल. त्यांचा आज वाढदिवस आहे. त्या निमित्‍ताने त्यांना खूप -खूप शुभेच्छा..
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील राजाटाकळी येथील रहिवासी असलेले ज्ञानेश्‍वर आर्दड हे
गेल्या ३४वर्षांपासून शिवसेनेत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख आहे. १८ फेब्रुवारी १९६९ रोजी त्यांचा जन्म झालेला असून आज त्यांना ५३ वर्षे पूर्ण झाले असून ५४ व्या वर्षात ते पदार्पण करत आहेत. त्यांचे वडिल बालाजी आर्दड हे वारकरी संप्रदायात होते. दुर्दैवाने ते आज ह्यात नसले तरी त्यांचे चांगले विचार, चांगले संस्कार ज्ञानेश्‍वर आर्दड यांच्यावर झालेले आहेत. त्यामुळे कुणासोबत गद्दारी करणे हे ज्ञानेश्‍वर आर्दड यांच्या रक्‍तात नाही, ही वस्तूस्थिती कुणीही नाकारू शकणार नाही. दहावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी कुंभार पिंपळगाव येथील सरस्वती भुवन हायस्कूलमध्ये घेतलेले असून आणि 12 वी पर्यंतचे शिक्षण त्यांनी संभाजीनगर (औरंगाबाद ) येथील नामांकित विवेकानंद कॉलेजमध्ये पूर्ण केले. गावातच नव्हे तर तालुक्यात त्यांना माऊली या नावाने ओखळले जाते. तर घरात त्यांना बप्पा म्हणून हाक मारली जाते. गेल्या ३४ वर्षांत त्यांनी किसान सेनेचे उपजिल्हाप्रमुख, शिवसेनेचे गुंज विभाग प्रमुख, गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन आणि गावातील ग्रामपंचायतीचे सदस्य या पदांवर यशस्वीरित्या कामगिरी बजावलेली आहे. वास्ताविक पहाता तसा विचार जर केला तर ज्ञानेश्‍वर आर्दड यांना आतापर्यंत शिवसेनेत मोठे पद मिळायला पाहिजे होते. परंतु दुर्दैवाने पक्षाने त्यांना उपेक्षित ठेवले आहे, असे मला वाटते. कारण अशा एकनिष्ठ शिवसैनिकांची संख्या फार कमी आहे. यापुढे तरी एकनिष्ठतेेचे फळ शिवसेेनेने त्यांना द्यावे, अशी अपेक्षा आहे.
गेल्या ३४ वर्षांपासून शिवसेनेच्या वतीने त्यांनी अनेक आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदविलेला आहे. एवढेच नाही तर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात जेल भोगलेली आहे. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह सर्व महापुरूषांची जयंती, पुण्यतिथी कार्यक्रमातही त्यांचा सक्रीय सहभाग असतो. जनतेच्या सुख दुःखात सहभागी त्यांचे प्रश्‍न, अडचणी सोडविण्यासाठी ते सातत्याने सक्रीय असतात. त्यामुळे राजाटाकळी गावात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. प्रामाणिकपणा, प्रचंड कष्ट करण्याची तयारी, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास हे गुण आर्दड यांच्या अंगी आहेत. दिलदार मनाचा माणूस, हसतमुख व्यक्‍तीमत्व, मनमिळावू स्वभाव, धाडशीपणा, विनाकारण कुणाविषयी मनात शंका, कुशंका न घेणारे सरळ स्वभावाचे माऊली आहेत. त्यामुळे तर घनसावंगी तालुक्यात चांगला माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. माऊली यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांचे पुढील आयुष्य सुख, समृद्धी, भरभराटीचे जाओ, त्यांना चांगले, सुदृढ आरोग्य मिळावे, याकरीता खूप -खूप शुभेच्छा……