
रावेर ( शेख शरीफ)
जळगाव जिल्ह्यातील कासोदा ता, एरंडोल येथील समाजसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार नुरुद्दीन मुल्लाजी यांना गांधी मंडेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे
त्यांच्या सामाजिक कार्य व पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन होप फाउंडेशन अँड चारीटेबल ट्रस्ट मुंबई यांचे फाउंडेशन प्रेसिडेंट एडवोकेट डॉ, शेख अहमद यांनी हा पुरस्कार देऊन सन्मानित केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या
यापूर्वीही त्यांना जिल्हास्तरीय राज्यस्तरीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.











































