Home जळगाव केंद्र सरकारची आधारभूत (हमीभाव) धान्य खरेदी नियमीत होत नसुन केंद्र सरकार शेतक-यांची...

केंद्र सरकारची आधारभूत (हमीभाव) धान्य खरेदी नियमीत होत नसुन केंद्र सरकार शेतक-यांची फसवणुक करीत आहे ती त्वरीत थाबवावी अन्यथा शेतकरी खासदारांच्या घरावरा समोर आदोलन करतील याची केंद्र सरकारने घ्यावी.सोपान पाटील यांची मागणी.

228

रावेर ( शेख शरीफ)

जळगाव जिल्हयात केंद्र सरकार आधारभूत धान्य खरेदीचा लाभ केंद्र सरकार शेतकऱ्यांना सात वर्षांपासून देत नसल्याने शेतक-यांच्या कर्जात वाढ झाल्याने शेतक-यांच्या आत्महत्याचे प्रमाणात वाढ झालेली आहे ती थांबवण्या साठी केंद्रसरकारने त्वरित हमी भाव धान्य खरेदीची वाढ करण्याचे काम भाजपाचे सत्ताधारी खासदारांनी व विरोधीपक्ष खासदारांनी लक्ष घालुन येणा-या अधिवेशनात शेतक-यांच्या तुर मका हरभरा कड धान्य खरेदीचा पुर्वी प्रमाणे शेतक-यांचे धान्य पुरेपुर खरेदीची सरसकट धान्य आल्या दिवसापासून शेतक-यांचे धान्य पुर्णपणे मोजणी होते तो पर्यंतची मुदत द्यावी व आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरू करावे. उदाहरणार्थ पुर्वी धान्य खरेदीचे केंद्र सरकारचे धान्य खरेदीचे खरीपाच्या हंगामाचे परिपत्रक साधारण१० आक्टोंबरला यायचे त्यात ३१ मार्च पर्यंत धान्य खरेदीची मुदत असायची शेतक-यांचे पुरेपूर धान्य खरेदी व्हायची खरेदी बारदाना संपला किंवा धान्य गोडाऊन भरले त्याच वेळेस धान्य खरेदी बंद राहायची शेतक-यांना हमी भावाचा पुरेपूर मोबदला मिळायचा वेळेवर पैसे सुद्धा मिळायचे. भाजपा सरकार केंद्रात सत्तेत आल्यानंतर दिवसापासून सरसकट धान्य खरेदीचे आदेश देत नसुन राज्यात उदाहरणार्थ काही टनापर्यंत पर्यंत खरेदीचे आदेश देण्यात आले आहे त्यामुळे मध्येच दिलेला कोठा पुर्ण होतो व धान्य खरेदी बंद पडते राज्यसरकार कोठा व मुदतवाढ वाढ मागणी करते ब-याच दिवसानंतर केद्र सरकारकडून अल्प कोठा मिळतो काही दिवसातच कोठा संपतो वरील खेळ सुरू होतो पुर्वी शेतक-यांचे खरेदी झाल्याल्या धान्याचे पैसे आठ दिवसाच्या आत मिळायचे आता केंद्र सरकार एक ते दोन महीने उशिराने पैसे देते नुकताच केंद्र सरकारने अर्थ संकल्प सादरकेला त्यात सुद्दा भरीव तरतुद न करता कपात केली हमीभाव धान्य खरेदी साठी बजेटमध्ये वाढ करावी व पिळवणूक थांववावी अनेक शेतकरी धान्य नोंदणी साठी जेरीस येतात ऑनलाईन नोंदणी त्यासाठी ऑनलाईन धान्य पेरणीच्या नोंदणी तलाठी कार्यालयात अनेक वेळा फे-या मारल्यावर नोंदणी होते नोंदणी नंतर धान्याची खरेदीचा नबंरच येतच नसतो वेळीच धान्य खरेदी बंद पडत असते त्यामुळे शेतकरी कंटाळून नाईलाजास्तव बाजारात धान्य विक्रीसाठी नेतो तिथे त्याच अक्षरशा कबंरडे मुळते हमी भावापेक्षा हजार दोन हजार रुपये कमी भावात धान्य विकावे लागते भाव कमी मिळाल्याबद्दल तो व्यापा-याला जाब विचारतो व्यापारी त्याच्या कडे त्याच्या नुकसानाची कहाणी सांगतो हे भाजप सरकार केंद्रात सत्तेवर आल्या दिवसापासून आम्ही सुद्धा नुकसानच सहन करतोय हंगाम सुरूवात होते नविन धान्य येते भाव बरे आसता बाजार भावाचा विचार करुन आम्ही उच्या भावात धान्य घेतो व केंद्र सरकार लगेच धान्य आयात करते व बाजार भाव पडतात त्यामुळे आमचे ब-याच प्रमाणात नुकसान होते केंद्र सरकारच्या चुकिच्या आयात निर्यात धोरणामुळे ऐन हंगामात धान्याचे भाव पाळण्याचे छडयंत्र सुरू आहे शेतक-यांची पिळवणूक केंद्र सरकारने आल्या दिवसापासून करीत आहे आतरराष्ट्रीय कंपन्या बाजार भाव पाळण्याचे छडयंत्र करीत आहेत हंगामात केंद सरकारला हाताशी धरुन थोडफार धान्य आयात करुन बाजार भाव पाळुन ते धान्य खरेदी करुन गोडाऊन भरुन ठेवतात व नंतर आतरराष्ट्रीय बाजारात जास्त भाव असलेल्या देशात निर्यात करुन अब्ज रुपये कमविण्याचे त्यांचे छडयंत्र सुरू आहे हे सर्व थांबविण्यासाठी राज्यातील देशातील खासदारांनी आवाज उठविण्याची आज गरज आहे तसे न झाल्यास शेतक-यांच्या यासर्व बावी लक्षात आल्यानंतर शेतकरी खासदारांना दोषी ठरवून गावात विरोध करतील व वेळ पडल्यास शेतकरी चिडून मोर्चा आंदोलन खासदारांच्या घरावर नेतील त्यासाठी शेतकरी हीत लक्षात घेऊन सत्ताधारी खासदार सह विरोधी खासदारांनी एकजूट दाखवून त्वरित शेतकरी हिताच्या निर्णयाबाबत येणाऱ्या केंद्रीय अधिवेशनात शेतक-यांचे वतीने आवाज उठवुन शेतक-यांना पुरेपूर हमी भाव मिळवणे साठी योग्य निर्णय घ्यावा व शेतक-यांना न्याय द्यावा ही आग्रहाची विनंतीचे निवेदन सोपान बाबुराव पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा जळगाव यांनी पंतप्रधान,केंद्रीय कृषीमंत्री,परराष्ट्र मंत्री, केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री,
माजी केंद्रीय कृषीमंत्री, मुख्यमंत्री,अन्न पुरवठा मंत्री भुजबळ,खासदार सुप्रिया सुळे खासदार,रक्षाताई खडसे खासदार,उन्मेष पाटील व सर्व खासदार महाराष्ट्र राज्य यांना वरील मागणीचे निवेदन दिले.