Home मुंबई १०० कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करा – “पत्रकार संरक्षण समिती ची राज्यपालांना मागणी”

१०० कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करा – “पत्रकार संरक्षण समिती ची राज्यपालांना मागणी”

1545

पत्रकारांना धमक्या देणे , घरी गुंड पाठवून घरावर हल्ला करणे , सूडबुद्धीने त्यांचे कार्यालय तोडणे , त्यांना खोट्या केसेसमध्ये अडकवणे याबाबत क्राइम ब्रांच मार्फत सखोल चौकशी करण्याची केली विनंती…!

मुंबई – बुधवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२२ रोजी सामाजिक कार्यकर्ते व संपादक / पत्रकार संरक्षण समितीचे मुंबई अध्यक्ष रवि गवळी यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन आरेतील शंभर करोड रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी करून झालेल्या महसुलाच्या नुकसानाची निश्चित करून गुन्हे नोंद करून संबंधित अधिकाऱ्याच्या व गुंड ठेकेदाराच्या खिशातून हा महसूल वसूल करून शासनाचे हे नुकसान भरून काढण्यासाठी पत्र दिले . जबाबदारी आरे दुग्ध वसाहतीमध्ये विविध ठिकाणी एकूण १७ गोदामे आहेत सदर गोदामे आरे कार्यालयामार्फत निविदा पद्धतीने भाडेतत्त्वावर दिली जातात व त्यामुळे शासनास निश्चित असा महसूल प्राप्त होतो सन २०१२ ते २०१७ या कालावधीमध्ये प्रति चौरस फूट प्रतिमाह रू .७ ९ .०० सेवाकर या दराने प्रतिमाह २,२ ९ , ६८५ रू . भाडेतत्त्वावर ही देण्यात आलेली होती .

महागाई निर्देशांका प्रमाणे २०१८ मध्ये हा दर वाढणे अपेक्षित होते परंतु वरिष्ठांशी कोणताही पत्रव्यवहार न करता भ्रष्ट अधिकाऱ्यांनी ठेकेदारास फायदा पोहोचविण्याच्या उद्देशाने दर न वाढवता ६०.३० प्रति चौरस फूट प्रतिमाह ९ , ९ ७,०७०.५० रू . असा कमी केला . ज्यामुळे पाच वर्षात शासनाच्या महसुलात अंदाजे ४० करोड रुपयांचे नुकसान झाले . वास्तविक २०१७ मध्ये टेंडर संपण्यापूर्वीच ६ महिने अगोदर निविदा प्रक्रिया सुरू करणे अपेक्षित असताना तसे झाले नाही . त्यामुळे शासनाचा अंदाजे २० करोडोचा महसूल बुडाला आहे . आरेतील युनिट क्रमांक २ येथील गोदाम क्रमांक ३ मध्ये दि . १७ डिसेंबर २०११ च्या मध्यरात्री पोलीसांनी २४ लाख ४४ हजार ४०० / – रूपये किंमतीचे ब्लॅकचे धान्य आणि ३५ लाख ७२ हजार ९ ०० / – रूपये किमतीच्या वाहनांसह एकूण ६० लाख १७ हजार तीनशे ( ६० ९ ७३०० / – ) रुपयांचा मुद्देमाल जप्त केला . आरे सुरक्षा विभागाचा स्टाफ विशेषकरून सुरक्षा अधिकारी विजय वाघ हे एवढ्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर धान्याचा साठा होत असताना तसेच मोठमोठे ट्रक आरे कॉलनीच्या आत येताना व बाहेर जात असताना नक्की काय काम करत होते ? एवढे मोठमोठे धान्य भरलेले ट्रक आरेच्या सुरक्षा विभाग का लक्ष देत नव्हता ? सामाजिक कार्यकर्ते व संपादक / पत्रकार संरक्षण समितीचे मुंबई अध्यक्ष रवि गवळी यांनी राज्यपालांशी बोलताना हा प्रश्न मांडला . अधिकाऱ्यांच्या चुकीच्या भूमिकेमुळे कारोना काळात शासनाच्या तिजोरीत खडखडाट असताना देखील शासनाचे महिना लाखो रुपयांचे व वार्षिक करोडो रुपयाचे नुकसान होत आहे . विशेष म्हणजे सध्या नियुक्त असलेले सुरक्षा अधिकारी विजय वाघ यांच्या दापचरी येथील कार्यकाळात करोडो रुपयांचा ड्रग्ज साठा सापडला होता . त्यानंतर शिक्षा म्हणून त्यांची बदली आरे याठिकाणी करण्यात आली परंतु वाघ यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात अनधिकृत गोष्टी घडत असतानाच अशाप्रकारे लाखो रुपयाचे बेकायदेशीर धान्य सापडल्यामुळे तसेच त्यांच्या आरे येथील नियुक्तीला ४ वर्ष पूर्ण झाली असताना देखील ते अध्याप या खुर्चीवर नियुक्त कसे आहेत ? असा प्रश्न रवि गवळी यांनी राज्यपालाकडे मांडला . विशेष म्हणजे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी नथू राठोड यांच्या करोडो रुपयांच्या घोटाळ्यानंतर प्रधान सचिव अनुप कुमार उपसचिव राजेश गोविल यांची उचलबांगडी झाली परंतु ज्या सहाय्यक सुरक्षा अधिकाऱ्यांचा वापर करून नथू राठोड यांनी करोडोची माया जमविली त्या विजय वाघ या अधिकाऱ्यावर अद्याप कारवाई न होण्यामागचे कारण काय ? मागील चार वर्षापासून विजय वाघ यांच्या आशीर्वादाने पर्यावरणाचे नुकसान करून आग लावून वृक्ष तोडून मोकळ्या जागेवर बेकायदा बांधकामे सुरू असल्याची माहिती गवळी यांनी राज्यपालांना या वेळी दिली आरे दुग्ध वसाहतीतील ठेकेदारानी अधिकाऱ्यांना हाताशी यरून / मॅनेज करून निविदा प्रक्रियेत घोटाळा करून गोदाम व गाळे आपल्या ताब्यात घेतले असून शासनाशी करारनामा देखील केलेला नाही . मुळात एग्रीमेंट ( करारनामा ) केलेले नसताना हे गोदाम व गाळे ठेकेदार कोणत्या अधिकाराखाली मागील ४ वर्षापासून वापरत आहेत व आरे सुरक्षा विभागाने हया गाळ्याचा ताब्या दिलाच कसा यांची चौकशी होणे गरजेचे आहे . ठेकेदार हे गाळे व गोदाम परस्पर भाड्याने देऊन दाम दुप्पट भाडे वसूल करत आहे . परंतु शासनास कोणतेही भाडे भरत नासल्यामुळे शासनाचा अंदाजे ३० करोडचा महसूल बुडाल्याची गंभीर बाब गवळी यांनी राज्यपालांना दाखवुन दिली . शासनाने ठेकेदारांशी केलेल्या करारनाम्यातील नियम व अटी मधील अट क्रमांक १ मध्ये स्पष्ट लिहिले आहे की , निविदाकाराचे पूर्ण चरित्र चांगले असावे . त्याच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याबाबत कोटांत निर्णय प्रलंबित नसावा असे असताना वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये भयंकर स्वरूपाच्या गुन्हयाचे ४ दखलपात्र गुन्हे नोंद असलेल्या मयूर गोसावीयाने ही माहिती लपवून शासकीय निविदा प्रक्रियेत भाग घेतला . मुख्य कार्यकारी अधिकारी नथू राठोड यांच्या मदतीने शासनाची दिशाभूल केली वरील सर्व आरोपांचे ठोस पुरावे सोबत जोडुन तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी ” नथू राठोड ” , सहाय्यक सुरक्षा अधिकारी ” विजय वाघ ” , तत्कालीन दुग्ध विकास आयुक्त ” नरेंद्र पोएम ” तसेच न तत्कालीन प्रधान सचिव ” अनुप कुमार ” उपसचिव ” राजेश गोविल यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून शासनाचे करोडो रुपयांचे नुकसान केल्या प्रकरणी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना आपल्या स्तरावर चौकशी करून या अधिकाऱ्यांना कायमचे घरी बसविण्याची व झालेल्या महसुलाच्या नुकसानाची जबाबदारी निश्चित करून गुन्हे नोंद करून संबंधित अधिकाऱ्याच्या व गुंड ठेकेदाराच्या खिशातून आता हा महसूल वसूल करण्यासाठी एक दक्ष नागरिक , पत्रकार / संपादक म्हणून न कर्तव्यभावनेने शासनाचे हे नुकसान भरून काढण्यासाठी पुराव्यासह पत्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिल्याचे रवि गवळी यांनी सांगितले. तसेच घोटाळे बाहेर काढल्यानंतर काही भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्यांना मॅनेज करून संविधानाचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना धमक्या देणे , पत्रकारांच्या घरी गुंड पाठवून घरावर हल्ला करणे , सूडबुद्धीने त्यांचे कार्यालय तोडणे , त्यांना खोट्या न केसेसमध्ये अडकवणे याबाबत क्राइम ब्रांच मार्फत सखोल चौकशी करण्याची विनंती देखील केली . यावेळी गवळी यांचे म्हणणे राज्यपालांनी शांतपणे ऐकून घेत याबाबत संबंधित विभागाशी पत्र व्यवहार करून कारवाई करण्याचे आदेश देतो असे सांगितले .