Home यवतमाळ शौचालय ईमारत पाडलेल्या घटनास्थळाला सभापती अनिता चव्हाणची भेट

शौचालय ईमारत पाडलेल्या घटनास्थळाला सभापती अनिता चव्हाणची भेट

193

महागाव:-तालुक्यातील हिवरा येथील वार्ड क्रमांक चार मधील महिला शौचालयाची ईमारत ज्यामधे तब्बल बारा सौचालय होती हि योजना ज्या काळात अमंलात होती तेव्हा फक्त महागाव तालुक्यात दोनच ठीकाणी ह्या योजने अंतर्गत काम झाले होते त्या मधे हिवरा व फुलसांवगी असल्याचे समजते. अंदाजे २००० ते २००३ मधे बांधलेले हे शौचालय सुुस्थीतीत असताना व त्याचा वापर होत असतांना राजकीय महंत्वाकाक्षा ठेऊन हि ईमारत पाडन्यात आल्याने नाराजी व्यक्त करन्यात येत आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत ग्रामपंचातच्या सत्ताधारी गटाने केलेल्या बेकायदेशीर कामा विरोधात सामाजिक कार्यकर्ते राम जाधव यांनी जनहितार्थ रंनशिग फुकंले आहे.

हिवरा सं ग्रामपंचायत मधे सत्ता परिर्वतन होताच सत्ताधारी गटाने कारण नसताना महिला शौचालयाची ईमारत ज्या मधे तब्बल बारा शौचालय असल्याची माहीती आहे . ते पाडल्याचे प्रकरण सध्या संपुर्ण जिल्हाभर गाजत असुन या प्रकरनाची दखल जिल्हा प्रशासनाने घेऊन पंचायत समीती महागाव यांना अवहाला सादर करायचे आदेश सुध्दा दिले होते. तसी चौकशी समितीने हिवरा सं येथे येऊन चौकशी केली. परंतु प्रशासनातील जबादार आधिकारयाना या लाखो रु च्या नासधुस प्रकरणाचे गांभीर्य दिसत नसल्याने पुढील कार्यवाही शुन्य असुन सरकारी मालमत्तेची नासधुस करुन बेकायदेशीर काम करणाऱ्यांना पंचायत समिती प्रशासन पाठीशी तर घालत नाही ना ? असा प्रश्न येथील नागरीकांना पडला आहे.
दरम्यान बुधवारला महागाव पं स च्या कर्तव्य दक्ष सभापती अनिता चव्हाण यांनी घटनास्थळाला भेट देऊन सदर जागेची पाहाणी केली व सचिवा ना जाब विचारला असता हिवरा सं ग्रामपंचायतचे सचिव सावळकर यांनी मला या बाबत काहीही कल्पना नसुन सदरचे सौचालय हे सत्ताधारी गटातील सदस्याने माघारीच पाडल्याचे सभापतीना दुरध्वनीवरुन सांगीतले. ग्रामपंचायतच्या जबाबदार आधिकारया कडुन मिळालेल्या या अजब ऊत्तराने सभापती मॅडम सुध्दा काही काळासाठी अचंबीत झाल्या होत्या.या प्रकरणातील दोषी लोकांना वाचवन्याचा कट तर शिजत नाही ना अशी शंका ऊपस्थीता मधुन व्यक्त होत होती.
हिवरा सं येथील वार्ड क्र चार मधील सदरचे शौचालयाची ईमारत ही लाखो रु खर्चुन महिलाच्या सुविधे साठी बांधन्यात आली होती ज्या ईमारतीत तब्बल बारा सुलभ शौचालयाची सोय करन्यात आली होती हे विषेश
ही ईमारत कोणतीही परवानगी कींवा निर्लेखन अवहाल न घेताच एका राञीतुन पाडुन हिवरा ग्रामपंचायच्या सत्ताधारी गटाने एक प्रकारे स्वच्छ भारत अभियानाला ठेंगा दाखवल्याची औरड होत असुन सचिवाने सदर ईमारत पाडल्याची माहीत झाल्यावरही वरीष्ठाना किंवा कायदेशीर कारवाई न करता कागदी घोडे नाचवन्यातच पलीकडे कोणतीही ठोस अशी कार्यवाही केल्याच सध्या तरी दिसत नसल्याचा आरोप या संपुर्ण प्रकरणाची तक्रार करनारे माहीती आधिकार कार्यकर्ते राम जाधव यांनी केला आहे.
आता महागाव पं स च्या सभापती अनिता चव्हाण यांनी या प्रकरनाची गंभीर दखल घेतली असुन सत्ताधारी लोकांन कडुन अशा प्रकारे कोणतीही परवानगी नसताना शासनाच्या संपत्ती ची नासधुस होत असेल व ग्रामसेवक सुध्दा बेजबादारपणे ऊत्तरे देत असेल तर हे म्हनजे ज्या लोकांनी तुम्हाला निवडुन दिल त्या लोकांचा विश्वासघातच म्हनावा लागल अशी प्रतीक्रीया दिली.या वेळी ग्रामपंचायत सदस्य पंजाबराव पाटील कदम,राम जाधव,प्रकाश डांगे, भगवानराव फाळके, महेश कामारकर, विनोद खोंडे,कृष्णा पाटीलसह ग्रामपंचायतचे कर्मचारी सुधीर कदम व स्वप्नील बेलखेडे आणि वार्ड क्र चारचे नागरीक ऊपस्थीत होते.