
बोदवड / रावेर (शेख शरीफ)
कर्नाटकात झालेल्या शाळा व महाविद्यालयात हिजाब बंदी विरोधात जळगाव जिल्ह्यातील बोदवड शहरातील नवयुवकांतर्फे राष्ट्रपती व पंतप्रधानांना बोदवड तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले.
निवेदनात 28/12/2021 पासून कर्नाटक राज्यातील उडापी जिल्ह्यातील 5 शाळा, महाविद्यालये ज्यात 3 सरकारी आणि 2 खाजगी शाळा, महाविद्यालये आहेत. त्यामध्ये मुस्लिम मुलीना हिजाब घालण्यापासून रोखले आणि शाळेत, कॉलेजमध्ये येण्यास बंदी घातली. ज्याच्या विरोधात तेथील मुस्लीम मुलींनी भारतीय घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी महाविद्यालयाच्या गेटसमोर बसून शैक्षणिक संस्थांच्या विरोधात आंदोलन केले. आंदोलनात सहभागी विद्यार्थिनींशी बोलून तोडगा काढण्यात आला. दि. ०७/०२/२०२२ पासून त्या विद्यार्थिनींना शाळा,महाविद्यालयात हिजाब घालण्याची परवानगी मिळाली.
परंतु हिजाब परिधान करणाऱ्या विद्यार्थिनींना वेगळ्या वर्गात बसवले जात आहे. त्या विद्यार्थिनींविरुद्धचा हा संविधानाचा एक प्रकारे अपमानच आहे. व त्यांच्याशी भेदभाव केला जात आहे. हे पूर्णपणे कायदा आणि संविधानाच्या विरोधात आहे.
मुस्लिम विद्यार्थिनी स्वतःच्या सुरक्षेसाठी हिजाब घालत असतील तर कर्नाटक सरकारने त्यांना संरक्षण द्यावे.व कर्नाटक सरकारने याकडे तत्काळ लक्ष देऊन हिजाबवरील बंदी हटवण्याचे निर्देश द्यावेत. तसेच भारतीय राज्यघटनेच्या कलम 25 चे उल्लंघन करणाऱ्या शैक्षणिक संस्थांवर तात्काळ कारवाई करावी. अशी मांगणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनावर नगरसेवक जफर शेख, नगरसेवक मुजमिल शाह, शेख वसीम,नदीम,मुजमिल, इजहार शेख,अकिल बागवान, अन्सार, रेहान,आदिल खान,समीर पिंजारी,लतीफ शेख,अकिल,नईम खान,तौफिक,अकबर,अजहर सह अनेक तरुणांच्या सह्या होत्या.











































