Home यवतमाळ फिरत्या पथकाने वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या “२ लाख ३० हजाराचा...

फिरत्या पथकाने वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या “२ लाख ३० हजाराचा दंड ठोठावला”

161

यवतमाळ / मुकूटबन –  झरी जामणी तालुक्यातील सिंधीवाढोणा येथील दोन ट्रॅक्टर वाळूची अवैध वाहतूक करीत होते. त्यांच्या विरुध्द तालुका प्रशासनाच्या फिरत्या पथकाने वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्याच्या मुसक्या आवळून चक्क २ लाख ३० हजाराचा दंड ठोठावला असून या मार्गावर रेती तस्करी करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

मुकुटबन मंडळ अंतर्गत वाळू पथकाने सतत कार्रवाई करीत असल्याने रेती तस्कर भूमिगत झाले असे वाटत होते तरी सुध्दा काही अट्टल गौणखानिज तस्कर पथकाच्या कारवाई न जुमानता वाळूची तस्करी करीतच आहे. गौणखानिज तस्करीला लगाम लावण्यासाठी मुकूटबन मंडळ मध्ये तहसीलदार गिरीश जोशी यांचे मार्गदर्शनात फिरते पथक स्थापन करून या पथकात नायब तहसीलदार महेश रामगुंडे, नायब तहसीलदार अशोक ब्राम्हणवाडे, मंडळ अधिकारी बाबुसिंग राठोड, तलाठी रमेश राणे व कोतवाल सन्मुखानंद कांबळे, अडेगाव व मांगलीचे तलाठी हे सतत रात्रीला १० वाजेपासून पहाटे ५ वाजेपर्यंत गस्त करून वाळू तस्करावर नजर ठेवीत आहे.

ता. ३० च्या रात्री ११ वाजेपासून महसूल कर्मचाऱ्यांचे पथक गस्त करीत असताना अडेगाव मार्गावरील रेल्वे फाटक जवळ रात्री १ वाजता सिंधीवाढोणा येथील एक ट्रॅक्टर वाळूने भरलेला अडेगाव येथे जाण्यासाठी आला. त्याला रेल्वे फटका जवळ थांबवून त्याच्याकडे चौकशी केली असता कोणत्याही प्रकारचा वाहतूक परवाना नव्हता त्याच्याकडून मोबाईल हस्तगत करून ट्रॅक्टर बाजूला लावून पुन्हा दुसरा ट्रॅक्टर येणार आहे असे माहीत पडले. दुसरा ट्रॅक्टर पहाटे ४ वाजता आला. ट्रॅक्टर चालक गणेश आवारी दुसरा ट्रॅक्टर चालक गजानन निखाडे दोघेही राहणार सिंधीवाढोणा यांचेवर कारवाई करण्यात आली आणि या दोन्ही ट्रॅक्टर वर प्रत्येकी एक लाख १५ हजार प्रमाणे दंड ठोकून दोन्ही ट्रॅक्टरला मुकूटबन पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले. ही कारवाई तहसीलदार गिरीश जोशी यांचे मार्गदर्शनात फिरते पथकातील नायब तहसीलदार महेश रामगुंडे, नायब तहसीलदार अशोक ब्राम्हणवाडे, मंडळ अधिकारी बाबुसिंग राठोड, तलाठी रमेश राणे यांनी पार पाडली.