Home जळगाव निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान तर्फे प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात साजरा

निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान तर्फे प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात साजरा

276

रावेर (शेख शरीफ)

निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान तर्फे शहरातील रसत्यावरिल निराधार व अनाथ आजी-आजोबासाठी फ़ूड बैंक चालविले जाते याच बरोबर वस्ती भागातील गरजु व होतकरु विद्यार्थ्यांसाठी निःस्वार्थ वर्ग चालविले जाते या निःस्वार्थ वर्गाच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित विविध सांस्कृतिक कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले होते , या कार्यक्रमा च्या अध्यक्ष स्थानी डॉ.केदार थेपडे,सुषमा थेपडे होते तर प्रमुख अतिथि म्हणून जळगाव पोलिस दलाचे पोलिस उपनिरीक्षक श्री. राजू मोरे, लोकवंत कलाकार विनोद ढगे, भरारी फॉउंडेशन चे दिपक परदेशी, उद्योजक सौ.कांचन साने,प्रल्हाद जावळे,माजी क्रीड़ा अधिकारी किरण जावळे आदि मान्यवर उपस्थित होते, प्रमुख मान्यवरांचे हस्ते भारत मातेचे प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करुण सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरु झाली या नंतर निःस्वार्थ वर्गाचे आरती पाटिल व नैतिक वैष्णव यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्व व प्रजासत्ताक दिनाबदल ची संपूर्ण माहिती सांगितली तसेच कृष्णा सोनार (वय ८ )या विद्यार्थ्यानी अंक १ पासुन ते १०० पर्यंत अंकाचे वर्ग (squares) चे उत्तर तोंडी दिले त्याच बरोबर सिद्धि घेंगट ( वय ७) या विद्यार्थ्यानी ने भारतातील जनरल नॉलेज ची सखोल माहिती भारतातील राज्यांची राजधानी , महाराष्ट्र तील, भारतातील व जगातील उंच शिखरांची नावे, विद्यमान प्रधानमंत्री, अर्थ मंत्री, राष्ट्रपति, महाराष्ट्र चे मुख्यमंत्री व जळगाव चे महापौर पर्यंत चे नाव व त्यांचे कार्यकाळ,राष्ट्रीय खेळ, गीत, राष्ट्रीय भाषा,प्राणी,पक्षी, या बदल ची संपूर्ण माहिती इंग्लिश भाषेत तोंडी दिली विशेषतः सिद्धि ही सफाई कर्मचारी ची मुलगी आहे आणि ती जिल्हा परिषद शाळेत शिकते या दोन्ही विद्यार्थ्याना अविनाश जावळे सर यांनी घडविले आहे या दोन्ही गरजु व होतकरु विद्यार्थ्यानी उपस्थित लोकांचे व मान्यवरांचे मन जिंकली या नंतर देव घेंगट,रणवीर धवलपुरे, मोहित घेंगट,मोहित जावळे,अनुजा पाटिल, आदर्श गोडाले,साक्षी गोडाले,भूमिका बडगुजर,दर्शना बाविस्कर, कनिष्का चव्हाण या विद्यार्थ्यानी देशभक्ति पर गीत वर नृत्य सादर केले तर आस्था घेंगट,मानवी जावळे, अक्षरा जावळे,वैष्णवी मेहरा,साक्षी मेहरा,शिवा मेहरा,प्रियांश वैष्णव, सोहम उपाध्ये,प्रतीक दिकवाल,माधव व्यास,संतोषी पाटिल,दिशा उपाध्ये,दिव्यांशी राजपूत,संस्कृति उपाध्ये,ईशा उपाध्ये, परशिका चव्हाण या विद्यार्थ्यानी शुर-वीरांचे ड्रेस परिधान करून फैंसी ड्रेस चे सादरिकरण केले कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडन्यासाठी निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान चे सतीश जावळे, धनंजय सोनवणे, शारदा सोनवणे,धीरज जावळे,पूनम भाटिया,देवेंद्र जावळे,नकुल सोनवणे,सुलतान पटेल,प्रवीण तायड़े,प्रदीप घेंगट,संदीप घेंगट आदिनी परिश्रम घेतले तर सूत्रसंचालन संस्थापक अध्यक्ष श्री.अविनाश जावळे यांनी सादर केले.