Home मराठवाडा कुंभार पिंपळगावात दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी ज्ञानसरिता व्याख्यानमाला

कुंभार पिंपळगावात दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी ज्ञानसरिता व्याख्यानमाला

200

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय शाखा कुंभार पिंपळगाव ( ता‌‌‌‌.घनसावंगी, जि.जालना )च्या वतीने दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी ज्ञान सरिता प्रवचन मालेचे आयोजन करण्यात आले आहे.आजच्या या स्पर्धेच्या, ताणतणावाच्या वातावरणामध्ये प्रत्येक व्यक्ती मानसिक सुख- सुखसमाधानापासून स्वतःला खुप दूर अनुभवत आहे.त्याच बरोबर प्राकृतिक आपत्ती सुध्दा व्यक्तिचे मनोबल नष्ट करत आहे.

या धकाधकिच्या,धावत्या जीवनात मानसिक स्थैर्य निर्माण करणे ,आंतरिक शक्तीचा विकास करण्यासाठीं ब्रह्माकुमारीज विद्यालया अंतर्गत ज्ञान सरिता प्रवचनमालेचे आयोजन करण्यात येत आहे.तरी या प्रसंगी सर्वानी उपस्थीत राहून कार्यक्रमाचा आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या टिचर ब्रह्माकुमारी दिपा बहेन यांनी केले आहे.ज्ञानसरिता प्रवचनमाला कार्यक्रमातर्गत तणावमुक्त जीवन,आंतरिक शक्तीचा विकास ,मानसिक सुखशांति अनुभूती,आत्म अनुभूती,परमात्म अनुभुती.आशा विविधांगी महत्वपुर्ण विषयांवर विशेष निमंत्रित महानहस्ती प्रवचन करणार आहेत.ज्ञानसरिता या प्रवचनमाला कार्यक्रमाचा शुभारंभ रविवारी,३० जानेवारी२०२२ रोजी ,वेळ सायं. ७ ते ९ या वेळेत,डॉ.राजुरकर यांचा हॉल,गव्हान चौफुली येथे होण्याचे निश्चित झाले आहे, असे प्रसिद्धि पत्रकाद्वारे सांगण्यात आले.