
धर्माबाद : ता. प्रतिनिधी राहुल वाघमारे
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मौलाना अबुल कलाम आझाद विचार मंच, धर्माबाद कडून कोरोना चा वाढता प्रभाव रोखण्यासाठी शासनाद्वारे देण्यात आलेले नियमांचे पोस्टर बनवून शहरातल्या प्रत्येक चौकात, सर्वशासकीय कार्यालयात पोलिस स्टेशन, कृ.उ.बाजार समिती, नगर पालिका, लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय, रेल्वे स्थानक तसेच सार्वजनिक ठिकाणीसुद्धा लावण्यात आले. या वेळी, धर्माबाद पोलिस स्टेशन चे कर्तव्यदक्ष सहायक पोलिस निरीक्षक मा. शिवप्रसाद कत्ते ,आणि लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचे उपाध्यक्ष गंगाधर गुजराती , सचिव डॉ. काकाणी , सहसचिव वर्णी नागभूषण , प्रभारी प्राचार्य सुशीला मॅडम, विद्यार्थी प्रिय शिक्षक डॉ. मोईन शेख सर, कृ. बा. समिति चे सचिव व कर्मचारी, ट्रॅफिक पोलिस , सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक, अनेक कर्मचारी, धर्माबाद शहरातील नागरिकांना हे पोस्टर देण्यात आले.
ह्या उपक्रम राबिवल्यानंतर सर्व अधिकाऱ्यांकडून व नागरिकांकडून मौलाना अबुल कलाम आझाद विचार मंच चे अध्यक्ष सय्यद बाबर, उपाध्यक्ष शेख गौस, उपाध्यक्ष असलम शेख, कोषाध्यक्ष वसीम खान, सहकोषाध्यक्ष फरदिन शेख व सदस्य सय्यद सैफ, ईस्माईल खुरेशि या सर्वजनांनचे कौतुक करून सर्वसादस्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
—————–चौकटीत———–
धर्माबाद शहरात देखील रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत जनजागृती केली जात आहे. जेणेकरून सर्वांकडून कोरोना नियमावलीचे पालन होईल. तसेच शहरातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात यावी या उद्देशाने मौलाना अबुल कलाम आझादकडून शहरात सार्वजनिक ठिकाणी पोस्टर देऊन जनजागृती अभियानाची सुरुवात केली. ही माहिती विचारमंचचे शहर अध्यक्ष यांनी दिली.











































