Home विदर्भ शाळा व्यवस्थापन समितीचे वतीने सॅनिटायझर व मास्क वाटप

शाळा व्यवस्थापन समितीचे वतीने सॅनिटायझर व मास्क वाटप

151

यवतमाळ –  राळेगाव पं. समिती अंतर्गत येत असलेल्या मौजा देवधरी येथे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा देवधरी येथील जिआयझेड बायफ संस्थेचे सीआरपीच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ग्राम पंचायत कार्यालय,देवधरी येथे 26 जानेवारी रोजी ग्रामस्थांना सॅनिटायझर व मास्क यांचे वाटप करण्यात आले. कोविड मित्र सौ. मनीषा भारसकरे आणि शाळा व्यवस्थापन समितीचे बंडू भारसकरे यांनी सॅनिटायझर, मास वाटप केल्यामुळे त्यांचे ग्रामस्थांच्या वतीने कौतुक करण्यात आले. ह्यावेळी आरोग्य कर्मचारी साठोने मॅडम, एम.एच. टाकसांडे,अविनाश वरके, सरपंच, उपसरपंच तसेच महाजन सर, वेले सर, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. ह्यावेळी ऑनलाईन मिटींग घेण्यात आली होती. समस्यांचे निराकरण न झाल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते बंडू भिमाजी भारसकरे ह्यांनी नाराजी व्यक्त केली.