Home विदर्भ …त्या शौचालय इमारत पाडल्याची चौकशीचे आदेश धडकले

…त्या शौचालय इमारत पाडल्याची चौकशीचे आदेश धडकले

245

जि.प.सदस्य पंकज मुडे यांनी उचलला जि.प. स्थायीच्या बैठकी मध्ये मुद्दा…!

यवतमाळ / महागाव – कोणतीही परवानगी न घेता शौचालय इमारत पाडल्याची तक्रार झाल्यानंतर यावर इमारत पाडून शासनाचे नुकसान करणाऱ्या दोषींवर कारवाई होणार की नाही या संदर्भात जि.प.सदस्य पंकज मुडे यांनी जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती च्या सभेत मुद्दा उपस्थित केला असता जि.प.प्रशासनाने तत्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश महागाव गटविकास अधिकारी यांना दिले आहेत.
महागाव तालुक्यातील हिवरा(संगम)येथे केंद्र पुरस्कृत संपुर्ण स्वच्छता अभियानांतर्गत वार्ड क्र.४मध्ये महिला शौचालयाचे बांधकाम करण्यात आले परंतु कालांतराने ग्राम पंचायत मध्ये सत्ता परिवर्तन होताच सत्ताधारी गटाने कोणतीही परवानगी किंवा निर्लेखन समितीचा अहवाल न घेताच मनमानी करीत ही शौचालय इमारत पाडल्याने राष्ट्रीय माहिती अधिकार महासंघाचे यवतमाळ जिल्हा प्रचारप्रमुख राम जाधव यांनी जिल्हाधिकारी व जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी यवतमाळ यांच्याकडे तक्रार सदर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली होती या संदर्भात जिल्हा परिषद सदस्य पंकज मुडे यांनी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत कोणी ग्राम पंचायत पदाधिकारीआपल्या अधिकाराचा गैर वापर करून शासकीय मालमत्तेचे नुकसान करीत असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार की नाही? असा प्रश्न उपस्थित करून दोषींवर कारवाईची मागणी केल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने महागाव गटविकास अधिकारी यांना तीन दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.गटविकास अधिकारी खरोखरच निपक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई होण्यासाठी कशा पद्धतीने अहवाल वरिष्ठांना सादर करतात याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

शासकीय मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या दोषींवर कारवाई होणे गरजेचे. हिवरा ग्राम पंचायतमध्ये शौचालय इमारत पाडण्यासंदर्भात कोणताही पत्रव्यवहार न करता तसेच कोणतीही शासकीय परवानगी किंवा मान्यता न घेताच मनमानी करून सदर इमारत पाडून नष्ट केली असुन सखोल व निःपक्ष चौकशी करण्यात येवुन दोषींवर अपात्रतेची कारवाई करून शासनाची झालेली आर्थिक नुकसान भरपाई करण्यात यावी.
:पंकज मुडे ( जि.प.सदस्य तथा स्थायी समिती सदस्य जि.प.यवतमाळ )

चौकशी अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केल्या जाणार.
हिवरा(संगम) ग्राम पंचायत मध्ये विना परवानगी शौचालय इमारत नष्ट केल्याप्रकरणी तक्रार प्राप्त झाली असुन त्यासंदर्भात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश गटविकास अधिकारी यांना देण्यात आले असुन अहवाल प्राप्त झाल्यानंतर अहवालामध्ये गुन्ह्याचे स्वरूप पाहुन यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर निःपक्षपणे कारवाई केली जाणार – अरविंद गुडधे ( उपमुख्यकार्यकारी अधिकारी पंचायत विभाग जि.प.यवतमाळ )