Home विदर्भ घाटंजी तालुक्यातील पारवा, कुर्ली मंडळातील अतिवृष्टी व ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी..!

घाटंजी तालुक्यातील पारवा, कुर्ली मंडळातील अतिवृष्टी व ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी..!

248

🟣➡️ राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना पारवा विभागातील शेतकर्‍यांचे निवेदन..!

( अयनुद्दीन सोलंकी ),

घाटंजी / यवतमाळ – सततचा पाऊस व अतिवृष्टी, ओला दुष्काळ मुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पिक पावसाने हिरावून गेले आहे. संततधार पावसामुळे आणि पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची प्रचंड हाणी झाली आहे. घाटंजी तालुक्यातील सात मंडळापैकी पारवा व कुर्ली या मंडळातील गांवे अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित ठेवण्यात आली आहे. सदरचा भेदभाव शासन करत असून घाटंजी तालुक्यातील केवळ पारवा व कुर्ली मंडळातील शेतकरी यांना सप्टेंबर व ऑक्टोबर 2021 मध्ये झालेली अतिवृष्टीमध्ये नुकसान भरपाई मिळाली नाही. तसेच खरीप हंगाम सन – 2020 मध्ये झालेल्या ओल्या दुष्काळामध्ये नुकसान भरपाई मिळाली नाही. उलट लागतच्या शिवणी मंडळातील शेकऱ्यांना दोन वेळा लाभ मिळाला आहे. या करिता संबंधित महसूल अधिकारी जबाबदार असून त्यांनी या लाभांपासून पारवा व कुर्ली येथील शेतकऱ्यांना वंचित ठेवले आहे. या करिता राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पारवा व कुर्ली या भागात प्रत्यक्ष भेट देऊन या मंडळातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी व ओला दुष्काळ आदीं नुकसान भरपाई मदतीचा लाभ देण्यास पात्र करावे, अशा आशयाचे निवेदन देउन पारवा व कुर्ली मंडळातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावे, अशी मागणी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे कडे केली आहे. निवेदन देतांना पारवा व कुर्ली मंडळातील शेतकरी सावंगी संगम येथील पोलीस पाटील विजय कुक्कलवार, प्रमोद अल्लुरवार (संगम सावंगी), भगवान सक्कनवार (वघारा टाकळी), गोवर्धन रेड्डी येल्टीवार (धामणधरी), गजानन निलावार, जितेंद्र अल्लुरवार, अमोल कन्नलवार (सावरगांव), माजी उपसरपंच संजय आरेवार (पारवा), अशोक संकुरवार, जितेंद्र अल्लूरवार आदीं शेतकरी उपस्थित होते.