Home विदर्भ अखेर राणा दांपत्य आणि युवा स्वाभीमान कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

अखेर राणा दांपत्य आणि युवा स्वाभीमान कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

330

 मनिष गुडधे

अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा व बडनेरा मतदार संघाचे आ. रवी राणा आणि युवा स्वाभिमान पार्टीच्या २५ ते ३० कार्यकर्त्यांसह शेकडो नागरिकांवर गाडगेनगर पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग अधिनियमा अंतर्गत तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.१२ जानेवारीला नियमांचे उल्लंघन करून खासदार नवनीत रवि राणा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर एक आंदोलन केले होते; ज्यामध्ये शेकडो महिलांचा सहभाग होता तर आमदार रवी राणा यांनी सांस्कृतिक भवन येथे एक कार्यक्रम त्यांच्याकडून घेण्यात आला होता.या दोन्ही ठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात राणा दाम्पत्य व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्या आले आहे.