
यवतमाळ विधानसभेत एकंदर पस्तीस शिबिरांचे आयोजन
शिवसेना प्रमुखांचे जयंती निमित्त आयोजन

यवतमाळ – शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जयंतीचे औचित्य साधून माजी मंत्री आमदार संजय राठोड व जिल्हा प्रमुख पराग पिंगळे यांचे संकल्पनेतून यवतमाळ विधानसभेत विविध गावांमध्ये एकंदर पस्तीस आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.ह्या आरोग्य तपासणी शिबिरांचा शुभारंभ यवतमाळ विधानसभेतील अकोला बाजार येथे आरोग्य तपासणी,नेत्र तपासणी,मोतीबिंदू शस्त्रक्रिया व औषधी वाटप शिबिराचे माध्यमातून आज करण्यात आला.ह्या शिबिराचे उदघाटन माजी मंत्री आमदार संजय राठोड यांचे शुभहस्ते करण्यात आले.ह्या प्रसंगी प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कालिंदाताई पवार,माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार, जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड,विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे,उपजिल्हा प्रमुख गजानन डोमाळे, उपजिल्हा प्रमुख किशोर इंगळे,तालुका प्रमुख संजय रंगे,जेष्ठ शिवसैनिक अरुण वाकळे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील डिवारे,अकोला बाजार चे सरपंच योगेश राजूरकर हे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचारांनी झपाटलेला शिवसैनिक कधीही स्वस्थ बसत नाही.गोर गरीब जनतेची व रुग्णाची सेवा करण्यात तो स्वतःला वाहून घेतो असे आमदार संजय राठोड या प्रसंगी म्हणाले.शिवसेनेतर्फे कोविड काळात केलेले कार्य व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेल्या लोकपयोगी कामांची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा कलिंदाताई पवार ह्यांनी दिली.ह्या आरोग्य शिबिरांचे आयोजनामागील हेतू ग्रामीण भागातील गोर गरीब जनतेला आरोग्य सेवा मिळवून देणे हा आहे असे जिल्हा प्रमुख पराग पिंगळे ह्यांनी सांगितले.ह्या प्रसंगी जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड,माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार, विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे ह्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.प्रास्ताविक तालुका प्रमुख संजय रंगे ह्यांनी तर कार्यक्रमाचे संचालन उपतालुका प्रमुख गजानन पाटील ह्यांनी केले.
ह्या उदघाटन समारंभात अकोला बाजार जिल्हा परिषद गटातील मांजर्डा येथील कृषि उत्पन्न बाज़ार समिति संचालक संजय राठोड,सरपंच इंदुबाई भोंडे,उपसरपंच बळीराम देवीदास राठोड,ग्राम पंचायत सदस्य विनोद शंकरराव टेकाम,ग्राम पंचायत सदस्य गोविंद भोंडे,सोसायटी सदस्य गोपाल सावरबंदे,सदस्य रविंद्र देठे,सदस्य सुनील मोवडे,बारडतांड्याचे माजी उपसरपंच प्रेमदास पवार,सालोड येथील माजी सरपंच सचिन पखाले,सहकारी संस्थेचे अध्यक्ष नामदेव राव दुतकर,घाटाणा येथील विकास सुरपाम,कामठवाडा येथील सरपंच प्रेम पवार,उपसरपंच अशोक राठोड,सदस्य उमेश चव्हाण,भारत पवार,लखन पवार,कैलास पवार,दारूबंदी अध्यक्ष धनसिंग चव्हाण,
मुस्लिम युवा कार्यकर्ते शेख़ शाहरुख,अमन पठान,हारून शेख़,तौफ़ीक़ शेख़,अब्दुल रेहमान,सलमान शेख़,राजिक शेख़,आसिफ़ शेख़,मुदसर सय्यद,अल्ताफ सय्यद व विविध पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.ह्या प्रसंगी योगेश वर्मा यांचे पुढाकारातून उपलब्ध केलेल्या अंबुलन्स चे लोकार्पण करण्यात आले.शिबिरांमध्ये एकूण चारशे एकोणविस रुग्णांनी आपली आरोग्य व नेत्र तपासणी करून घेतली.तसेच रुग्णांना त्यांचे आजाराप्रमाणे मोफत औषधी वाटप सुद्धा करण्यात आली.शिबिरात मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी एकूण 20 रुग्णांची निवड झाली व त्यांच्या शस्त्रक्रिया शिवसेनेतर्फे करून देण्यात येणार आहे. शिबिराला लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबईचे विशेष सहकार्य लाभले.
हे शिबीर पुढे यवतमाळ विधानसभेतील विविध गावांमध्ये निरंतर 10 फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे.
या शिबिराचे यशस्वी आयोजनाकरिता आयोजन समिती प्रमुख योगेश वर्मा,उपतालुका प्रमुख गजानन पाटील,विभाग प्रमुख गणेश आगरे,गणेश आगलावे,राजू मादेशवार,अयुब पठाण,हमीद अंकल,अमोल टेकाडे, देवानंद खंडारे,रफिक शेख,पंडित खंडारे, अंकित खराबे,शमी भाई,अमोल चांदेकर,पंकज पवार,उल्हासभाऊ,शेख सर,दिनेश चव्हाण,संजय मोहोड,संतोष राठोड,अब्दुल रहेमान,विशाल इंदरवाडे,गजानन भोंडे,विकास चव्हाण,योगेश जाचक,जितेंद्र पवार,अरविंद आवळे,किशोर छापेकर,गणेश आडे,सचिन आत्राम,गफ्फारभाई व अकोलाबाजार येथील शिवसैनिकांनी पुढाकार घेतला होता.
शिवसेना रुग्णसेवेकरिता कटिबद्ध
शिवसेना प्रमुखांचे जयंती निमित्य यवतमाळ विधानसभेत पस्तीस गावांमध्ये आरोग्य व नेत्र शिबिरे आम्ही घेत आहोत.हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण ह्या शिकवणी अनुसारे पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब व जिल्ह्यात जिल्ह्याचे शिवसेना नेतृत्व संजय राठोड यांचे मार्गदर्शनात आम्ही काम करीत असतो.ह्या आरोग्य व नेत्र तापाणी शिबिरांनंतर येत्या काळात यवतमाळ येथे हृदय रोग,अस्थीरोग ह्या सह अनेक गंभीर रोगांचे महाआरोग्य शिबीर आयोजन करण्याचा आमचा मानस आहे.










































