
क्रीडा शिक्षक युवराज पद्माकर माळी सरयांची पुरस्कारासाठी निवड
रावेर (शेख शरीफ)
जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघातर्फे सन २०२० चे जिल्हास्तरीय आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार व क्रीडा जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे असुन रावेर येथील सरदार . जी. जी हायस्कुल ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक श्री युवराज पद्माकर माळी यांची निवड करण्यात आली असुन ह्या पुरस्कार त्यांनी केलेली सरदार जी जी हायस्कुल मधील क्रीडा क्षेत्रात त्यांची विविध अशी नवनवीन खेळाडू यांना प्रोत्साहान देणे व त्या मुलानां यशाच्या शिखरा पर्यन्न पोहचविण्याचे संपुर्णपणे मेहनत घेणे ह्या मुळे गेल्या तीन ते चार वर्षात शाळेतील क्रीडांगणाचा कायापालट करण्यात महत्वाची भुमिका होय जिल्हास्तरीय पुरस्कार निवड समिती सदस्य डॉ पी आर चौधरी क्रीडासंचालक,श्री शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय,जळगाव, प्रशांत कोल्हे कार्याध्यक्ष, जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघ, श्री जयांशू पोळ सहसचिव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन , श्री प्रा आसिफ खान .जिल्हास्तरीय गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार्थी,महाराष्ट्र शासन व डॉ रणजित पाटील राज्यस्तरीय आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार्थी यांच्या पुरस्कार निवड समितीने जिल्हाभरातून आलेले प्रस्ताव पुरस्कार्थी निवड प्रक्रिया पूर्ण केली. लवकरच पुरस्कार वितरण करण्यात येणार असुन पुरस्कार समारंभाचे आयोजन लवकरच करण्यात येईल असे जळगाव जिल्हा शाररिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रदीप तळवलकर व सचीव राजेश जाधव यांनी सांगीतले.











































