Home बुलडाणा सुवर्ण भस्म देण्याचे अमिष दाखवून व्यापाऱ्याला लाखो ने लुटले ,

सुवर्ण भस्म देण्याचे अमिष दाखवून व्यापाऱ्याला लाखो ने लुटले ,

684

 

खऱ्या पोलिसांनी सिनेमा स्टाईल एका नकली पोलिसाला पकडले.

अमीन शाह

बुलडाणा

घरात सुख शांती आणि आर्थिक फायदा पोहचविण्यासाठी वसमत जिल्हा हिंगोली येथील एका व्यापाऱ्याकडून ६ लाख नगदी आणि ७ लाखांचा धनादेश घेऊन विशेष पूजेसाठी निघालेल्या टीमवर शेगाव नजीक नकली पोलिसांच्या चमूने धाड घालून ६ लाख रुपये लुटल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली. शहराबाहेर पैसे लुटण्यासाठी होत असलेल्या झटापटीत दरम्यान पेट्रोलिंग साठी गस्त घालीत असलेल्या शेगावच्या ग्रामीण पोलिसाना एका नकली पोलिसाला पकडण्यात यश आले असून या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय…
संतोषसिंह मन्नुसीह ठाकुर रा. वसमत जिल्हा हिंगोली असे फिर्यादी व्यापाऱ्याचे नाव असून विविध समस्यांनी ग्रस्त असलेल्या या व्यापाऱ्याला गाठून तुमचे दुःख दूर करून देतो त्यासाठी सुवर्णभस्म चा वापर करावा लागेल अशी बतावणी करून त्यापोटी 6 लाख रुपये रोख व 7 लाख रुपयांचा धनादेश घेतल्यानंतर विशेष पूजेसाठी खामगाव वरून वसमत कडे जात असताना टोळीच्या नियोजनाप्रमाणे शेगावाजवळ नकली पोलिसांनी व्यापाऱ्याची गाडी अडवून व्यापाराला मारहाण करीत गाडीतील 6 लाख रुपये टोळीने लुटून नेल्याची घटना घडली. दरम्यान शेगाव शहराबाहेर ज्या ठिकाणी ही घटना घडत होती त्या ठिकाणावरून पेट्रोलिंग गस्त घालणाऱ्या पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून फिर्यादी च्या साह्याने टोळीतील एकाला पकडन्यात यश मिळविले. शेख शब्बीर शेख गुलाब रा .बर्डे प्लाट खामगाव असे पकडण्यात आलेल्या नकली पोलिसांचे नाव असून मुख्य सूत्रधार सरफराज बाबा व त्याची टोळी फरार होण्यात यशस्वी झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.