
आमदार आपल्या दारी उपक्रमातुन शेकडो तक्रारींचा निपटारा

मनिष गुडधे – अमरावती जिल्हा प्रतिनिधी
आमदार देवेंद्रदादा भुयार यांच्या संकल्पनेतून मोर्शी तालुक्यातील विविध गावांत आमदार आपल्या दारी अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून, खेड येथे आयोजित आमदार आपल्या दारी उपक्रमाचा खेड, वरला, उदखेड, कोळविहिर, तरोडा, रायपूर, डोमक, आष्टोली, येथील ग्रामस्थांनी लाभ घेतला .
या उपक्रमाच्या माध्यमातून गावातील नागरिकांच्या महावितरण, ग्राम विकास व महसूल विभागाचे संबंधित असलेल्या सर्व अडचणी कशा सोडवता येतील यासाठी आमदार स्वतः सरसावले असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने ग्रामीण भागातील वृद्ध नागरिकांच्या संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या अडचणी मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होत्या. या सर्व अडचणी आता काही क्षणातच मार्गी लागत आहेत आणि यामुळे निराधारांना दिलासा मिळत आहे . जनतेला केंद्रबिंदू म्हणून आमदार देवेंद्रदादा भुयार यांनी हिची नवीन मोहीम हाती घेतली आहे त्या मोहिमेमुळे आता अनेक वर्षांपासून रखडलेले प्रश्न तात्काळ मार्गी लागत आहेत. लवकरच मोर्शी विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद गट आणि गण निहाय सर्व गावांना आमदार स्वतः भेटी देऊन त्यांचे प्रश्न गावात बसूनच मार्गी लावणार असून आता छोट्या छोट्या कामांसाठी वृद्ध नागरिकांना शहरात येण्याची आवश्यकता भासणार नाही. आणि हेच या मोहिमे मागची भावना असल्याचे आमदार देवेंद्रदादा भुयार यांनी यावेळी सांगितले.
या अभिनव उपक्रमाला मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्रदादा भुयार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नरेंद्रजी जिचकार, सरपंच सौ कल्याणी ताई राजस, तहसीलदार कृष्णकुमार ठाकरे, गट विकास अधिकारी रवींद्रजी पवार, ठाणेदार मोहंदूळे साहेब, उदखेड सरपंच धनराजजी राठोड, भूमी अभिलेख अधिकारी सोनारे साहेब, मोहनजी राजस, सुनीलभाऊ देशमुख, अमितभाऊ देशमुख, विवेकभाऊ देशमुख, हितेशभाऊ साबळे, रुपेशभाऊ वाळके, विपुलभाऊ हिवसे, रमाकांतभाऊ कोंडे, पंकजभाऊ हरले, अमोलभाऊ कडू, संदीपभाऊ अढाऊ, मधुकरराव अढाऊ, कमलदास इंगळे, प्रफुलभाऊ चिखले, मंगेशभाऊ इंगोले, सुरजभाऊ शहाणे, मुरलीभाऊ अढाऊ, पिंटूभाऊ बोबडे, प्रवीणभाऊ कोंडे, नकुलभाऊ अढाऊ, प्रीतमभाऊ राजस, सुनीलभाऊ लुंगे, स्वराजभाऊ तट्टे, रामदासभाऊ चांगोले, अरुणभाऊ झटाले, सुभाषभाऊ रडके, शेर खान, आशिष लुंगे, यांच्यासह शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी ,पदाधिकारी ग्राम पंचयात सदस्य व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.










































