Home विदर्भ चिखलवर्धा येथील उपसरपंच आकाश नडपेलवार विरुद्ध दाखल अँट्रोसिटी अँक्ट प्रकरणी अखेर जिल्हा...

चिखलवर्धा येथील उपसरपंच आकाश नडपेलवार विरुद्ध दाखल अँट्रोसिटी अँक्ट प्रकरणी अखेर जिल्हा व सत्र न्यायालयात ब समरी फायनल दाखल होणार..?

414

➡️ उप विभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे फिर्यादी सरपंच वर्षा कणाके हिला सुचनापत्र.!

अयनुद्दीन सोलंकी

घाटंजी / यवतमाळ – घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा येथील उपसरपंच आकाश भगवान नडपेलवार विरुद्ध फिर्यादी चिखलवर्धा येथील सरपंच वर्षा भिमराव कणाके हिच्या तक्रारीवरून पारवा पोलीसांनी संशयीत आरोपी आकाश नडपेलवार विरुद्ध 3 (1) (r), 3 (1) (s) अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच भादंवि कलम 504 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. सदर प्रकरणात पांढरकवडा येथील उप विभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी सखोल तपास केला होता. मात्र, सदर गुन्ह्याच्या तपासाअंती फिर्यादी सरपंच वर्षा कणाके हीने दाखल केलेली तक्रार खोटी असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर प्रकरणात यवतमाळच्या विशेष न्यायालय तथा जिल्हा व सत्र न्यायालयात “ब” समरी फायनल दाखल करण्यात येत असल्याचे सुचनापत्र फिर्यादीला उप विभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या कार्यालयाकडुन प्राप्त झाले आहे.
दरम्यान, फिर्यादी तथा चिखलवर्धा येथील सरपंच वर्षा कणाके हिची प्रतिक्रिया घेतली असता, पांढरकवडा एसडीपीओ यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केलेल्या ब समरी फायनल प्रकरणी आपण आक्षेप दाखल करणार असुन उपसरपंच व तत्कालीन सचिव विरुद्ध अतिरिक्त गुन्हे नोंदविण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

➡️ चिखलवर्धा ग्रामपंचायतची मासीक सभा 10 मार्च 2021 रोजी सरपंच वर्षा कणाके हिच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. मात्र, उपसरपंच आकाश नडपेलवार यांनी सरपंचाचा खोटा रबर स्टॅम्प वापरुन सरपंचाची खोटी सही करून पांढरकवडा येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात सिंमेट काँक्रिट रस्ता व नालीचे बांधकाम मंजुर करण्यासाठी खोटा व बनावट ठराव ग्रामसेवक पी. सी. दौड यांच्या हस्ताक्षरात तयार करून सादर केल्याचे सरपंच वर्षा कणाके हिला समजले. त्यावरुन सरपंचाची खोटी सही करून खोटा व बनावट ठराव दाखल केल्या प्रकरणी त्यांनी जिल्हा परिषद मध्ये लेखी तक्रार दाखल केली होती. सदर प्रकरणात कोणतीही कारवाई न झाल्याने सरपंचानी उपसरपंच आकाश नडपेलवार व ग्रामसेवक पी. सी. दौड विरुद्ध पारवा पोलीस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ करून खोटा व बनावट ठराव तयार केल्या प्रकरणी पारवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, सदर प्रकरणात उपसरपंच आकाश नडपेलवार विरुद्ध अँट्रोसिटी अँक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, ग्रामसेवक पी. सी. दौड यांच्या विरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे 2 आँक्टोंबर 2021 रोजी सरपंच वर्षा भिमराव कणाके हिने पारवा पोलीस ठाण्यात उपसरपंच आकाश नडपेलवार व ग्रामसेवक पी. सी. दौड विरुद्ध दुसरी तक्रार दाखल केली. मात्र, सदर तक्रारीवरुन कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

➡️ मात्र, आरोपी आकाश भगवान नडपेलवार विरुद्ध दाखल अँट्रोसिटी अँक्ट गुन्हयात उप विभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी केलेल्या तपासात सदर तक्रार खोटी असल्याचे निष्पन्न झाल्याने यवतमाळच्या विशेष न्यायालय तथा जिल्हा व सत्र न्यायालयात ब समरी फायनल दाखल केल्याचे विश्वासनिय वृत आहे.