Home विदर्भ शाळेत पुन्हा किलबिलाट , भातकुली तालुक्यातील प्राथमिक शाळा सुरु

शाळेत पुन्हा किलबिलाट , भातकुली तालुक्यातील प्राथमिक शाळा सुरु

451

अखेर आज २० मिहिन्यानंतर प्राथमिक शाळेची घंटा वाजली

प्रतिनिधी -: धनराज खर्चान

अमरावती / भातकुली-: आज दि १ डिसें रोजी तालुक्यातील सर्व १ ली ते ४ थी शाळा सुरु करण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्यानंतर तालुक्यात आज हे चित्र दिसले. विद्यार्थ्याच्या सुरक्षेच्या दुष्टीने शाळा प्रशासनाने निजंतूकीकरण, मास्क बंधनकारक , सोशल डिस्टसिंग , या मुद्यावर खास करून लक्ष दिलेले आढळून आले .पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या चांगला प्रतिसाद दिसून आला.विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आज द्विगुणित झाला कारण मागील २० महिन्यापासून कोरोनामुळे शाळा बंद होत्या, शिक्षक ,मुख्याध्यापक, व शिपाई यांच्यात आज वेगळाच उत्साह पाहायला मिळाला अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना फुले व मिठाई वाटप करून स्वागत करण्यात आले .