Home मराठवाडा राज्य पत्रकार संघाच्या अधिवेशनात पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे-पंडित बोराडे

राज्य पत्रकार संघाच्या अधिवेशनात पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे-पंडित बोराडे

167

जालना-लक्ष्मण बिलोरे

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे रविवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी अधिवेशन होत आहे अधिवेशनाला मराठवाड्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय कार्याध्यक्ष पंडित बोराडे यांनी केले आहे.
पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष राज्य संघटक संजयजी भोकरे दिल्ली चे जेष्ठ पत्रकार अशोक जी वानखेडे तसेच मुंबईचे इलेक्ट्रॉनिक प्रमुख रणधीर कांबळे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असून प्रदेश अध्यक्ष मलखान वसंतराव मुंडे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे मराठवाडा अध्यक्ष वैभव स्वामी यांच्यासह मराठवाड्यातील मराठवाड्यातील अनेक मंत्री लोकप्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थितीत होणार आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण दयानंद सभागृह,बार्शी रोड लातूर हे असुन रविवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सकाळी ठिक १० वाजता आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे,अशी विनंती पंडित बोराडे यांनी केली आहे.