Home विदर्भ घाटंजी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सोनाली माडकर यांच्या विरोधात जि. प....

घाटंजी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सोनाली माडकर यांच्या विरोधात जि. प. अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कडे लेखी तक्रार..!

710

➡️ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कालींदा पवार व मुख्य कार्यकारी अधिकारी डाँ. श्रीधर पांचाळ यांचे कारवाई करण्याचे आश्वासन..?

अयनुद्दीन सोलंकी

घाटंजी / यवतमाळ – घाटंजी पंचायत समिती अंतर्गत 15 व्या वित्त आयोगाची सुट्टीच्या दिवशी ई निविदा काढल्याने घाटंजी पंचायत समितीच्या अध्यक्ष व सचिवाने सदरची नियमबाह्य ई निविदा तात्काळ रद्द करुन शासन निर्णयानुसार व परिपत्रकानुसार नविन ई निविदा काढण्याची मागणी जिल्हा परिषद भाजपाचे सदस्य आशीष सुरेशबाबू लोणकर, जिल्हा परिषद भाजपाचे सदस्य सरीता मोहन जाधव, जिल्हा परिषद शिवसेनेचे सदस्य पावणी रुपेश कल्यमवार, भाजपाचे पंचायत समिती सदस्य अभिषेक शंकरराव ठाकरे व भाजपाचे पंचायत समिती सदस्य नयना जिवन मुद्देलवार आदींनी विभागीय आयुक्त अमरावती, जिल्हाधिकारी यवतमाळ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कालींदा पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाँ. श्रीकृष्ण पांचाळ आदींकडे समक्ष लेखी तक्रार करुन घाटंजी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सोनाली माडकर यांना तात्काळ निलंबित करुन त्यांचे स्थानांतर करुन नियमानुसार त्यांचे विरुध्द कायदेशीर कारवाई करण्याची मागणी, जिल्हा परिषद सदस्य आशीष लोणकर, सरीता जाधव, पावतीताई कल्यमवार, पंचायत समिती सदस्य अभिषेक ठाकरे व नयना मुद्देलवार आदींनी समक्ष भेटुन लेखी तक्रारीतुन केली आहे. तक्रारीच्या प्रती विभागीय आयुक्त अमरावती, जिल्हाधिकारी यवतमाळ या सह ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ आंदी कडे ई-मेल ने पाठवण्यात आल्याची माहिती पंचायत समिती सदस्य अभिषेक ठाकरे यांनी दिली आहे. दरम्यान, घाटंजी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सोनाली माडकर यांच्या विरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन घाटंजी येथील शिष्टमंडळाला जिल्हा परिषदेचे अध्यक्षा कालींदा पवार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाँ. श्रीथर पांचाळ यांनी दिल्याचे भाजपाचे मोहन जाधव यांनी या वेळी सांगितले. घाटंजी पंचायत समीतीची मध्ये तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष हे पंचायत समितीच्या सभापती, उपाध्यक्ष म्हणून उपसभापती, गट विकास अधिकारी सदस्य व पाणी पुरवठा विभागाचे उप विभागीय अभियंता हे सचिव असतात. मात्र, 15 व्या वित्त आयोगाच्या दुसरी ई निविदा काढतांना सचिव म्हणून पाणी पुरवठा विभागाचे उप विभागीय अभियंता अशोक धंबेचा (पांढरकवडा) यांना कुठेही विश्वासात घेतल्या गेले नाही. तसेच दुसरी ई निविदा काढतांना कोणतीही तालुकास्तरीय समितीची बैठक गट विकास अधिकारी सोनाली माडकर यांनी आयोजित केलेली नाही, असा आरोप पंचायत समिती सदस्य अभिषेक ठाकरे यांनी केला आहे. दि. 21 आँक्टोंबर रोजीच्या ई निविदा प्रक्रियेत अगोदर रघुवंशी इंटरप्राईजेस, परीज्ञा इंटरप्राईजेस व निलेश नायणवार ह्या ई निविदा भरण्यात आल्या होत्या. तसेच किशोर नायणवार यांनी ई निविदा भरलीच नसतांना त्यांचे नांव ई निविदा मध्ये समाविष्ट करण्यात आले. या बाबतची माहीती नायणवार यांना मिळाल्याने त्यांनी गट विकास अधिकारी सोनाली माडकर यांच्या कडे आक्षेप नोंदविला. त्यामुळे त्याचे नांव ई निविदा यादीतून कमी करण्यात आले. नंतर ई निविदाची मुदत संपल्यानंतर चौथ्या क्रमांकावर भरलेल्या ई निविदा धारकाचे नांव किशोर नायणवार यांचे जागेवर त्या ठिकाणी तिसर्‍या ई निविदा धारकामे नांव नियमबाह्य समाविष्ट करण्यात आले. सदरची वादग्रस्त पहीली ई निविदा तांत्रिक व ईतर कारणामुळे रद्द करण्यात आल्याचे खात्रीलायक रित्या समजते. तसेच आपल्या जवळच्या कंत्राटदार, पुरवठादार व विशिष्ट कंपनीला सदरचे काम मंजुर करण्यासाठी नियमबाह्य ई निविदा काढण्यात आल्याचा आरोप पंचायत समिती सदस्य अभिषेक ठाकरे यांनी केला होता. विशेष म्हणजे दुसऱ्या ई निविदेतील मुद्दा क्रंमाक 27 हा पुर्णत: नियमबाह्य असुन अध्यक्ष व सचिवचे ना हरकत प्रमाणपत्र घेण्याची अट त्यात स्वमर्जीने समाविष्ट केल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य आशीष लोणकर यांनी केला होता. विशेषतः 27 सप्टेंबर 2018 च्या शासन निर्णयानुसार ई निविदा फी व अनामत रक्कम हे डिमांड ड्राफ्ट किंवा F.D.R. आँनलाईन द्वारे खात्यात जमा करायचे असतांना सदर खाते क्रमांक घेण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात येऊन घेऊन जाण्याची अट नियमबाह्य टाकण्यात आल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्या पावतीताई रुपेश कल्यमवार हिने केला आहे. तथापि, तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष व सचिवाने ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष पंचायत समितीच्या सभापती निता आकाश जाधव असून सचिव म्हणून पाणी पुरवठा विभागाचे उप विभागीय अभियंता अशोक धंबेचा हे आहे. कारण या पुर्वी पंचायत समिती कडुन काढण्यात आलेल्या पहील्या ई निविदा मध्ये अध्यक्ष म्हणून पंचायत समितीच्या सभापती निता जाधव व सचिव म्हणून घाटंजी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सोनाली माडकर यांचे नांव स्पष्टपणे ई निविदावर समाविष्ट होते, हे येथे उल्लेखनीय. घाटंजी पंचायत समिती अंतर्गत 15 व्या वित्त आयोगाची दुसर्‍यांदा काढलेली ई निविदा शासन निर्णय व परिपत्रकानुसार काढण्यात आलेली नसल्याने 16 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व गट विकास अधिकारी पंचायत समिती घाटंजी यांचे कडे ई-मेल व आवक जावक शाखेत तीन जिल्हा परिषद सदस्य व दोन पंचायत समिती सदस्य आदींनी तक्रार नोंदवली होती. त्यात सदरची ई निविदा प्रक्रिया तात्काळ रद्द करुन शासन निर्णय व परिपत्रकानुसार नविन ई निविदा काढण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे 16 नोव्हेंबर रोजी काही पदाधिकारी व लोकप्रतिनिधी पंचायत समिती सदस्यांच्या कक्षात बसुन असतांना त्यांनी पंचायत समितीच्या कक्षेत पत्रकार परिषद घेऊन कलम 144 चा भंग करून पत्रकार परिषद घेतल्याचा आरोप गट विकास अधिकारी सोनाली माडकर यांनी करुन तशी तक्रार घाटंजी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र, पंचायत समिती कार्यालयातुन अधिक माहिती घेतली असता पंचायत समिती सदस्यांच्या कक्षेत कोणतीही पत्रकार परिषद झालीच नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मात्र, काही पत्रकारांना प्रत्यक्ष व काहींना व्हाँटस्अँप द्वारे तक्रारीची प्रत पाठविण्यात आल्याची माहिती, पंचायत समिती सदस्य अभिषेक ठाकरे यांनी दिली. दरम्यान, घाटंजी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सोनाली माडकर यांना तात्काळ निलंबित करुन त्यांचे स्थानांतर करुन नियमानुसार त्यांचे विरुध्द कायदेशीर कारवाई करण्याची मागणी, घाटंजी तालुक्यातील लोकप्रतिनिधीनी शासनाकडे केली आहे. या तक्रारीमुळे घाटंजी पंचायत समितीत खळबळ माजली आहे.