
अमरावती – मनिष गुडधे
सतत 14 दिवसांपासून सुरू असलेला एसटी कर्मचारी त्यांनी एकच जोर धरून ठेवला आहे एसटी चे राज्य शासनात विलगीकरण झालेच पाहिजे याकरिता सतत चौदा दिवसांपासून संपावर बसलेले एसटी कर्मचारी प्रत्येक एसटी आगाराच्या सोमर ऊपोशनाला बसलेले आपल्याला दिसून येत आहे2014 पासून दिवाकर रावते परिवहनमंत्री झाल्यावर ते आतापर्यंत प्रत्येक तिकिटामागे
1 रुपया
अधिभार लावला जातोय.
दररोज किमान 65 लाख प्रवासी प्रवास करतात
आणि गणित असे बसते बघा
6500000 x 365 x = 7 वर्षे
डोके फिरण्याची वेळ आली ना.. ?
आता विचार करा..
कुठल्या योजनेत हा सर्वसामान्य जनतेकडून वसूल केलेला पैसा खर्च केला गेला.. ?
शिवसेना सांगू शकते का.. ?
कोणाच्यातरी नावाने सुरू केलेली योजना दाखवतील. मग त्या योजनेचा किती जनतेला लाभ झाला.. ?
तसेच 1992 पासून मृत्यूफन्ड म्हणून प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या पगारातून 40 रुपये आता
45 रुपये कापले जातात
आपण 40 रुपये धरू
40 x 12 = 480 रुपये असे 29 वर्षे 13920 रुपये प्रत्येक कामगाराच्या पगारातून कापले गेले व जाताहेत, आपण 14000 रुपये समजुयात.
किमान 100000 कामगार आहेत असं धरलं तर
100000 x 14000=1400000000 रुपये
गरगरलं ना डोकं.. ?
किती कामगारांना मृत्यूनंतर लाभ मिळाला, किती कामगारांची कर्जे मृत्यूनंतर माफ झाली (कर्जे माफ होत नाहीत PF मधून व मृत्यू फंड मधून वसुली केली जाते)
राज्य सरकारचा डिझेलवर प्रति लिटर ३५/- रू. व्हॅट आहे. दिवसाला एसटी महामंडळाला कोट्यावधी लिटर डिझेल लागते. त्यावर सरकारच्या तिजोरीत अब्जावधी रूपये जमा होत असतात.
तसेच प्रत्येक प्रवाशाने काढलेल्या तिकिटावर सरकारचा १७.५% प्रवासी कर आहे. म्हणजे कंडक्टर ने १ रू. चे तिकीट फाडले की १७.५ पैसे प्रवासी कर सरकारला मिळतो. शंभर रूपयाचे तिकीट असेल तर १७.५ रू. कर सरकारला मिळतो !
या व्यतिरिक्त रोड टॅक्स (वाहन कर) सरकारला मिळतो तो वेगळाच.१४,५०० गाड्या × वाहन कर = करून बघा !
खरे पहाल तर एस टी सरकारला पोसत असते, सरकार एस टी ला पोसत नाही. तरीही एस टी तोट्यात ? कमाल आहे.
एसटी हे सर्वात मोठे महामंडळ व सर्वात मोठे कुरण आहे.
अजूनही अशी बरीच कांडे आहेत म्हणून ही अंडी देणारी कोंबडी स्वतःकडे नकोय, दुसऱ्याकडे ठेवून स्वतःचे नियंत्रण दाखवून ओरबाडून खायला मिळालेले कुरण आहे स्वतःकडे ठेवले तर प्रत्येक वर्षे ऑडिट करावे लागेल आणि एक एक रुपयाचा हिशोब द्यावा लागेल जनतेला..म्हणून एसटी चे सरकारमध्ये विलीनीकरण नको . पाठिंबा देते वेळी १; डी एस पवार सरचिटणीस २; पी टी गावंडे जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ अमरावती जिल्हा ३ नामदेव गडलिंग अध्यक्ष महसूल विभाग ४;भास्कर रिठे प्रसिद्धी सचिव राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना अमरावती जिल्हा ५; पुरुषोत्तम पुराम साहाय्यक आदिनी 14 दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना आज दिनांक 23 11 2019 रोजी एसटी वर्कशॉप तपोवन विद्यापीठ वर्धा अमरावती यांच्या कडून जाहीर पाठिंबा देण्यात आला.










































