
घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
औरंगाबाद, जालना शहरानंतर अंबड-घनसावंगी तालुक्यातील काही शासनाचा करबुडव्या व्यापारी, संस्थांवर ईडीच्या धाडी पडणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असून यामुळे घाबरगुंडी उडालेल्या व्यापारी, संस्था, काही बुवाबाजी चमत्कार करून कोट्यावधींची बेहिशोबी मालमत्ता जमविलेल्या बाबा , बुवाबाजी चमत्कार करणारे,संत,महंत यांच्यातही खलबते सुरू झाली असून ईडीच्या धाडी पडणार या भीतीनं सारवासारव सुरू असल्याचे सांगितले जाते.प्रवर्तन संचालनालय,बेनामी मालमत्ता बाळगणारे ,करबुडव्यांवर कारवाई करत असते.औरंगाबाद , जालना शहरानंतर अंबड-घनसावंगी तालुक्यातील शासनाचा करबुडव्यांवर ईडीच्या केव्हाही धाडी पडू शकतात.ईडीचे तपासणी सत्र मंत्री, उद्योजक, व्यापारी,संत, महंत, बुवाबाजी चमत्कार करणारे बाबा लोक , बाॅलीवूड कलाकार, चित्रपट निर्माते, यांचेकडे होत असते.भारत सरकारने नियोजित हेतू साठी सदर संस्थेची स्थापना केलेली आहे.ईडीच्या कारवाईने भल्याभल्यांची झोप उडाली असून.अंबड- घनसावंगी तालुक्यात अनेक करबुडवे तसेच बेहिशोबी मालमत्ता जमविलेल्या व्यापारी, उद्योजक, पुढारी,सावकार, बुवाबाजी चमत्कार करणारे बाबा यांच्याकडे कोट्यावधींची बेहिशोबी मालमत्ता असून ही मंडळी ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.











































