Home विदर्भ गिरोली येथे ग्रंथ वाचन समाप्ती व एक दिवशीय धम्म संस्कार शिबीर संपन्न

गिरोली येथे ग्रंथ वाचन समाप्ती व एक दिवशीय धम्म संस्कार शिबीर संपन्न

262

अमरावती – धामणगांव रेल्वे तालुक्यातील गिरोली या गावात गेल्या 3महिन्यापासून बौद्ध विहारात चालू असलेल्या ग्रंथ वाचनाची आज समाप्ती करण्यात आली. तसेच याचं निमित्ताने एक दिवशीय ध्यान साधना धम्म संस्कार शिबीर आयोजित करण्यात आले होते.यावेळी शिबिराला मुख्य मार्गदर्शक म्हणूनबौद्ध संस्कार संघांचे मा.बडवाईक सर मा. भवते सर मा. अरुणजी डवले मा. चंदाताई डवले मा. जानकुताई खडसे हे प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी दिवस भर बौद्ध धम्माचे संस्कार, प्रज्ञा, शील, करुणा याचे महत्व मार्गदर्शकानी पटवून सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन पंचशील महिला मंडळ यांनी यशस्वी रित्या पार पाडली.

प्रतिनिधी -प्रशांत नाईक
साप्ताहिक पोलिसवाला