
प्रतिनिधी:-प्रमोद झिले येरला,
वर्धा – हिंगणघाट तालुक्यात येत असलेल्या ७६ ग्रामपंचायतीच्या ग्रामरोजगार सेवक संघर्ष समितीच्या मागील कार्यकारिणीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष,सचीव यांनी राजीनामा दिला असून नवीन ११ सदस्यीय कार्यकारिणी गठित करण्यात आली.येरला येथील ग्रामरोजगार सेवक रोशन येडे यांची अध्यक्षपदी सर्वानूमते निवड करण्यात आली.उपाध्यक्ष पंकज तायवाडे रोहनखेडा,सचीव गणेश भोयर येणोरा, कोषाध्यक्ष विजय ढगे काचनगाव,सहसचीव पंकज वानखेडे फूकटा तर सदस्य म्हणून गजानन हूलके दारोडा, विठ्ठलराव खोंड टेंभा,राजू कामलकर अल्लीपूर, दिलीपराव नाईक चिंचोली,उमेश राऊत शेकापूर, जितेंद्र वानखेडे टाकळी यांची निवड करण्यात आली.यावेळी राजू झाडे, प्रमोद कापसे, ओमप्रकाश कूमरे,दिलीप क्षीरसागर, प्रकाश येरमे, पंढरीनाथ बोंबले,राजू मून, गजानन मूजबैले, मिथून वावरे,राजू चिंचूलकर,खूशांत फूलकर, प्रशांत गणफाडे,किरण ढवस,विनोद मांगरूटकर,जंगल सती, गौतम फूलकर हे ग्रामरोजगार सेवक उपस्थित होते.










































