Home मराठवाडा घनसावंगी येथे ए आय एम आयची बैठक संपन्न

घनसावंगी येथे ए आय एम आयची बैठक संपन्न

379

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे दि.११ नोव्हेंबर रोजी एमआयएमचे जालना जिल्हा अध्यक्ष माजेद यांच्या नेतृत्वाखाली व जालना जिल्हा उपाध्यक्ष निसार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली घनसावंगी येथे तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी याच्या सोबत मिटिंग घेण्यात आली.

यावेळी मुंबई येथे येत्या २७ तारखेला होनाऱ्या सभेला उपस्थित राहण्यासंदर्भात चर्चा झाली.मुस्लिम समाजातील तरुणांना नोकरी व शिक्षणात आरक्षण मिळावे.यासाठी महाराष्ट्र प्रदेश ए.आय.एम.आयच्या वतीने मुंबई येथे भव्य अशा तिरंगा रँलीचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा खासदार ईम्तियाज जलील,कार्य अध्यक्ष जनाब गफार कादरी,आमदार ईसमाईल मौलिक,आमदार फारुख शाहा व महाराष्ट्रतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.

तसेच महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.घनसावंगी मतदारसंघातुन मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते मुंबईला जाणार आहेत,असे झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.यावेळी घनसावंगी तालुका उपाध्यक्ष शेख निजाम,जमील मौलाना,शेख उसमान,गुफराण फारुखी,हसन शेख,सय्यद शरिफ,मजेद कासमी,शमशु पठाण,नानासाहेब उबाळे,भास्कर पाटोळे यांच्यासह आदी कार्यकर्त व पदाधिकारी उपस्थित होते,अशी माहिती जालना जिल्हा उपाध्यक्ष निसार पटेल यांनी दिली.