Home मराठवाडा देव,धर्म आणि देशासाठी प्रेम असले पाहिजे- हभप समाधान महाराज भोजे

देव,धर्म आणि देशासाठी प्रेम असले पाहिजे- हभप समाधान महाराज भोजे

946

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

माय आणि मातृभुमी सर्वश्रेष्ठ आहे.मुलांवर संस्कार करा.’प्रेम’ म्हणजे स्वैराचार नव्हे, तरूणाईला तर प्रेमाची व्याख्याच कळाली नाही.प्रेम परमपिता परमेश्वर,धर्म आणि देशासाठी असले पाहिजे,असे प्रतिपादन हभप समाधान महाराज भोजेकर यांनी येथे केले.
कुंभार पिंपळगाव ( ता.घनसावंगी ) येथील अखंड हरिनाम सप्ताहात भाविक भक्तांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.या सप्ताहात तरूणांनी हिरीरीने सहभाग घेतल्याने चैतन्य निर्माण झाले आहे.हभप भोजेकर महाराजांचे हरिनाम सप्ताहाच्या श्रृखलेत भन्नाट किर्तन झाले.महाराज म्हणाले, संसाराचे मुळ दुःख आहे.म्हणून संसारात सुखाची अपेक्षा ठेवू नका.संसारात राहून सुख हवेच असेल परमात्म्याला शरण गेले पाहिजे.नास्तिक देव,धर्म, भगवंत मानत नाहीत… परंतु भगवंत नास्तिकाला मानतो.धर्माला अधर्मी लोकांपासून धोका असतो.
तरूणांना आवाहन करताना महाराज म्हणाले,जगा पण असे जगा किंवा नाव झाले पाहिजे.मरणाआधी सावध व्हावे ,किर्ती करून उरावे.देहाला काळ घेवून जाणार आहे तर धन हे कुबेराचे आहे.येथे मनुष्याचे काही नाही.धन जरूर कमवा परंतु धनाचा सत्कार्यात उपयोग झाला पाहिजे.देव,धर्म आणि देशासाठी प्रेम असले पाहिजे.या भुतलावावर माय आणि मातृभुमी सर्वश्रेष्ठ आहे.जगातला सर्वात गोड शब्द होता ‘ आई ‘ आता त्यात माॅडिफिकेशन होवून आईची मम्मी झाली.घरात आई राहिली नाही शाळेचा ठावठिकाणा राहिला नाही.
संसाराचे मुळच दुःख आहे म्हणून सुखाची अपेक्षा ठेवू नका
संसारात राहून सुख हवे असेल तर परमात्म्याला शरण जा.नास्तिक भगवंताला मानत नाही पण भगवंत नास्तिकाला मानतो.धर्माला अधर्मी लोकांपासून धोका आहे.जगा पण असे जगा कि नाव झाले पाहिजे.मरणाआधी सावध व्हावे किर्ति करून उरावे,देह हे काळाचे धन कुबेराचे…तेथे मनुष्याचे काय आहे.धन जरूर कमवा परंतु सत्कार्यात धनाचा उपयोग झाला पाहिजे.देव,धर्म आणि देशासाठी प्रेम असले पाहिजे.माय आणि मातृभुमी सर्वश्रेष्ठ आहे.तुमच्या आमच्या हाती काही नाही, मुलांवर संस्कार करा.जगातला सर्वात गोड शब्द होता आई आता आधुनिकीकरण झाले मम्मी झाली.घरात आईचे ठिकाण राहिले नाही शाळेचा ठावठिकाणा राहीला नाही.आई आणि गुरूंचे संस्कार नसल्याने तरूण पिढी भरकटली आहे.