Home विदर्भ बिमोद मुधाने यांचा वाढदिवस पेकर्डा येथिल स्मशानभूमीत वृक्षारोपण करून साजरा.

बिमोद मुधाने यांचा वाढदिवस पेकर्डा येथिल स्मशानभूमीत वृक्षारोपण करून साजरा.

209

यवतमाळ /  दारव्हा (प्रतिनिधी):- तालुक्यातील पेकर्डा येथील स्मशानभूमीत वृक्षारोपण करून सलग चौथ्या वर्षी ही बिमोद विठ्ठलराव मुधाने बहुजन मुक्ती पार्टी प्रभारी दारव्हा दिग्रस नेर विधानसभा मतदारसंघ यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला.
त्यावेळी प्रथम तथागत विठ्ठलास व कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज,राष्ट्रपिता जोतीराव फुले, क्रांतिज्योती सावित्री बाई फुले,राजर्षी छत्रपती शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,बळीराजा व सर्व बहुजन संत महापुरुषांना अभिवादन करण्यात आले.
आज विज्ञान युगात सुध्दा अंधश्रद्धेचा पगडा कमी होतांना दिसत नाही.दिवसाने भलेही अनेक व्यक्ती आपल्याला स्मशान भूमीत जातांना येताना दिसतात परंतु आजही कोणताही व्यक्ती रात्रीच्या वेळी स्मशान भूमीत जाण्यास धजावत नाही.तिथे मात्र मृत्यू पावलेल्या व्यक्तींनाच जाळल्या जाते.परंतु मृत्यू पावलेला आज पर्यंत कोणताही व्यक्ती जिवंत व्यक्तीला ना बोलल्याचे समजते, ना मारल्याचे कुठे ऐकले,परंतु जिवंत व्यक्ती एकमेकाला मरणे मारण्याच्या बाता करीत असताना सुध्दा एकमेकांना कुणीच घाबरत नाहीत.परंतु जिवंत व्यक्ती पेक्षा मृत्यू पावलेल्या व्यक्तीला लोक घाबरतात.म्हणजेच कुठे तरी अंधश्रद्धा कायम आहे.”बहुजन संत महापुरुष सांगून गेले की,जिथे जन्म आहे,तिथे मृत्यू अटळ आहे.” मृत्यू हे जगातील अंतिम सत्य आहे.आणि ते कुणीही नाकारू शकत नाही.ते फक्त आजचा उद्या वर जाऊ शकतो परंतु ते टळू शकत नाही.म्हणून या अंधश्रध्देच्या बाजारातून अनेकजण बाहेर पडावे व वृक्ष लागवड यासाठी की,अंतिम संस्काराच्या वेळी स्मशान भूमीत अनेकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागतो. अनेक ठिकाणी बसण्याची किंवा उभे राहण्याची सुद्धा व्यवस्था नसते.हा आदर्श जर ज्या घरातील व्यक्ती मरण पावला त्या व्यक्तीच्या आप्तस्वकीयांनी एक वृक्ष लागवड केली तर स्मशान भूमी परिसरात वृक्ष पण वाढतील व त्या व्यक्तीचे नाव पण मरणानंतर जिवंत राहील.तसेच स्वतः प्रती सुद्धा वाटते.म्हणून दरवर्षी प्रत्येक वाढदिवसाला एक झाड वड,पिंपळ यासारख्या ऑक्सीजन देणारे झाडे लावून त्याचे संवर्धन करण्याचे काम सुध्दा करीत आहेत.
बिमोद मुधाने यांच्यासह स्मशानभूमीत वाढदिवस साजरा करण्यासाठी आरती मुधाने (पत्नी),जीवक मुधाने (मुलगा),अनित्य मुधाने (मुलगा),विठ्ठलराव मुधाने (वडील),आशाबाई मुधाने(आई),वसंतराव मोहोड (शेंद्री बू)(सामाजिक कार्यकर्ते), दिलीप गवई,वसंतराव मुधाने,किसन मोहाडे,भास्कर गुघाने,रवींद्र मुधाने,भगवान मुधाने,दिगांबर मोहाडे(माजी उपसरपंच तथा सदस्य ग्रा.प.पेकर्डा),दिपक मुधाने(उपाध्यक्ष शाक्यमुनी बुद्ध विहार समिती),अंबादास महल्ले तर असे अनेक जण उपस्थित होते.
तर सिद्धार्थ मेश्राम (शहराध्यक्ष बी एम पी दारव्हा), इंजि.कुशल शंभरकर,अनिल राऊत पाटील,करण खंडारे पंकज मुधाने, प्रशांत गवई यांनी निवासस्थानी भेट देऊन केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच व्हॉटसअप,फेसबुक फोन व्दारे हजारो कार्यकर्ते, आप्तेष्ट,मित्र परिवाराने सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.